राज ठाकरेंचा तीन महिन्यात आठवा पुणे दौरा उद्यापासून

पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.
राज ठाकरेंचा तीन महिन्यात आठवा पुणे दौरा उद्यापासून
राज ठाकरे सरकारनामा

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनावर घेतल्याचे दिसत आहे. ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत.ठाकरे यांचा गेल्या तीन महिन्यातील हा तब्बल आठवा दौरा असून दोन दिवसात ते पुणे व पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटना बांधणीच्या कामाचा आढावा घेणार आहेत.(Raj Thackeray's eighth Pune tour in three months from tomorrow)

मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाला सर्वाधिक प्रतिसाद नाशिक आणि पुण्यातून मिळाला. पुण्यात मनसेचे तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. पहिल्या झटक्यात मनसे पुणे महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाली. त्यामुळे संघटना बांधणीवर लक्ष देऊन येत्या निवडणुकीत पुण्यात पक्षाची ताकद वाढविण्याचे ठाकरे यांचे प्रयत्न आहेत.

 राज ठाकरे
पेट्रोल-डिझलच्या दरवाढीचे चक्र थांबता-थांबेना

पक्षाचे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात ठाकरे यांचा हा आठवा दौरा आहे. पुण्यातील संघटना अधिक मजबूत करण्यावर ठाकरे यांचा भर आहे.उद्यापासून दोन दिवस ठाकरे पुण्यात थांबणार आहेत. उद्या सायंकाळी पाच वाजता शहरातील सर्व शाखाप्रमुखांना ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर शहर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.सायंकाळी साडेसहा वाजता राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शनिवारी सकाळी ठाकरे पुण्यातील विभाग अध्यक्ष व उपशहराध्यक्षांशी चर्चा करणार आहेत.त्यानंतर आजी-माजी नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत.

 राज ठाकरे
कोरोना बळींसाठी सानुग्रह अनुदान : पुणे जिल्ह्यातील १९ हजार कुटुंबांना मिळणार प्रत्येकी ५० हजार

ठाकरे यांचा दोन दिवसांचा दौरा केवळ पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवकांसाठी आहे.ज्यांना निरोप देण्यात आले आहेत. त्यांनीच या बैठकांना यावे विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन पक्षाचे नेते बाबू वागसकर यांनी केले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.