राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या 'या' मागण्या

दोन आठवड्यात ज्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांचा समाचार राज ठाकरे यांनी यावेळी घेतला.
Narendra Modi, Raj Thackeray
Narendra Modi, Raj Thackeray sarkarnama

पुणे : मनचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आजच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, राणा दांपत्य यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे काही मागण्या केल्या. (Raj Thackeray latest news)

सभेत राज ठाकरे यांचा स्थगित झालेला अयोध्या दौरा हा प्रमुख मुद्दा होता. अयोद्धा दौरा स्थगित होण्यामागील कारणे त्यांनी सांगितली. मागील दोन आठवड्यात ज्यांनी ज्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांचा समाचार राज ठाकरे यांनी यावेळी घेतला.

Narendra Modi, Raj Thackeray
MNS :अयोध्या दौऱ्याला विरोध करण्याची रसद महाराष्ट्रातून पुरविण्यात आली ; राज कडाडले

"देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणा, समान नागरी कायदा लागू करा," या मागण्या राज ठाकरे यांनी मोदींकडे केल्या.

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  1. अयोध्या दौऱ्यात मनसैनिकांना अडकवण्यासाठीच वातावरण पेटवले, अन्यथा युपीच्या एका खासदाराची हिम्मत काय?

  2. औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर आतापर्यंत झाले असते. मात्र, शिवसेनेला राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करायचा आहे.

  3. मुख्यमंत्री कोणाच हिंदुत्व खरे आणि कोणाचे खोटे, अशी पोरकट भाषा करत आहे. त्यांनी रिझल्ट दाखवावा.

  4. राजकारणामुळेच औरंगाबादेत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करुन एमआयएमचा खासदार निवडून आला.

  5. उद्धव ठाकरेंच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? ते कोणती भूमिकाच घेत नाही.

  6. शरद पवार म्हणतात,अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी नव्हे तर राज्य विस्तारासाठी आला होता. पवारांनी असे राजकारण बंद करावे.

  7. अफझल खानच्या कबरीला फडींग करणाऱ्या या औलादी महाराष्ट्रात असूनही आपण थंड कसे?

  8. अयोध्या दौऱ्यांची तारीख ज्यांना तारीख खुपली, त्यांनीच हा सापळा रचला. त्यांना आमचं हिंदुत्व , भोंगे झोंबले, म्हणून त्यांनी हे केलं.

  9. अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली

  10. शिवसेनेमुळे एमआयएम वाढली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com