राज ठाकरे म्हणाले;राज्यात केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग सुरू आहे - Raj Thackeray said; missuse of Union eajencies in the State) | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

राज ठाकरे म्हणाले;राज्यात केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग सुरू आहे

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

पुणे शहर मनसेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन
आज ठाकरे यांच्या हस्ते झाले.

पुणे : राजकारणात जे नको आहेत त्यांना संपविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा सुरू असलेला वापर योग्य नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात केले. जे खरे गुन्हेगार आहेत ते मोकाट आहेत, असेही ठाकरे म्हणाले. केवळ या सरकारच्या काळात नव्हे तर कॉंग्रेसच्या काळातदेखील अशाप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात आल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.(Raj Thackeray said; missuse of Union eajencies in the State)

पुणे शहर मनसेच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन आज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. राजकारणात जे नको आहेत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न योग्य नाही. यातही ठराविक लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असताना खरे गुन्हगार मात्र, मोकाट असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ खडेसे यांच्या ईडी चौकशी संदर्भाने विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना ठाकरे यांनी खडसे यांच्या सीडी संदर्भात केलेल्या वक्त्व्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘‘ त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन, असे खडसे म्हणाले होते. त्यांच्या सीडीची मी वाट बघतोय.’’

नारायण राणे मंत्री झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला नाही, असे राणे यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना मी राणे यांना फोन केला होता. मात्र,त्यांचा फोन बंद होता.आता दोन दिवसांनी पुन्ही फोन करीन असे ठाकरे यांनी सांगितले. केंद्रातील सहकार मंत्रालयाबाबत विचारले असता, या संदर्भात तुम्ही शरद पवार यांना विचारा तेच योग्य उत्तर देऊ शकतील, असे ठाकरे म्हणाले.   

राज्यात पुणे-नाशिक नव्हे तर सर्वच प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे केवळ पुणे-नाशिक नव्हे तर राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांकडे आपले लक्ष असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात ठाकरे यांनी स्पष्ट केले. अर्थात या निवडणुकांना आणखी वेळ आहे. आधीच्या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका वेळेत होतायेत का पाहू, असे सूचकपणे ठाकरे यांनी सांगितले. राज्य सरकारचा कारभारच अजून बघायला मिळाला नाही. सारा काळ कोरोनातच गेला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Ghongade
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख