राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं ; मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा चिघळला..

पुण्यातील कोंढवा येथील नुरानी कब्रस्थानचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama

पुणे : मुंबईत शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुनही आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदीवरील अनाधिकृत भोंगे काढण्याबाबत पुण्यात मनसे 'खळखट्याक' करणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे मुस्लिम समाजाने राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. पुण्यातील कोंढवा येथील नुरानी कब्रस्थानचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या बाबतचा फलक येथे लावण्यात आला आहे. आज या फलकावरील राज ठाकरे यांच्या नावाला स्थानिक लोकांनी काळा रंग लावून राज ठाकरे यांचा निषेध केला आहे.

मशिदीतील भोंगे (Mosque Loudspeaker)काढण्यावरुन आता पुण्यात मनसेच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संबुस यांनी आता आक्रमक भूमिका घेत मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत पोलिसांना (pune police) पत्र दिले आहे. मनसेनं पोलिसांचा चार दिवसांच्या अल्टिमेटम दिला आहे.

Raj Thackeray
मशिदीवरील भोंगे काढा ; मनसेचा पोलिसांना चार दिवसांचा अल्टीमेटम

पुणे शहर मनसेकडून शहरातील पोलीस ठाण्यांना पत्र पाठविले आहे. डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने पत्र दिले आहे. याबाबत विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यालाही मनसेनं पत्र दिल आहे. ''चार दिवसात मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, अन्यथा दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करणार,'' असा इशारा मनसेनं दिला आहे.

Raj Thackeray
तुम मुझको कब तक रोकोगे ; राऊतांचं भाजपला खुलं आव्हान

मनसेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडताना मागील काही दिवसांपासून भाजपने लावून धरलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला.

राज ठाकरे यांनी त्यावेळी मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असे म्हटले होते. यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा थेट इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com