'संभाजीनगरच नामांतर झालं काय न झालं काय मी बोलतोय ना, अरे कोण तू?'

आमचं खरं हिंदूत्व यांच खोटं, यां सर्वांचं हिंदूत्त्व ढोंगी, हिंदूत्त्व म्हणजे काय वॉशिंग पावडर आहे का,
Raj Thackeray
Raj Thackeray

पुणे : ''आमचं खरं हिंदूत्व यांच खोटं, यां सर्वांचं हिंदूत्त्व ढोंगी, हिंदूत्त्व म्हणजे काय वॉशिंग पावडर आहे का, असली नकली करायला. हा काय पोरकटपणा सुरु आहे. प्रश्न हा आहे की हिंदूत्व काय आहे, तर आम्ही हिंदूत्वाचे रिझल्ट देतो. म्हणून आज देशात सकाळचे भोंगे बंद झालेत. भोंग्यांचा विषय सुरु झाला आहे तर एकदाचा तुकडा पाडून टाका, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. पुण्यातील आयोजित सभेत ते बोलत होते.

राज ठाकरे आंदोनल अर्धवट सोडतात असा आरोप केला जातो. पण तुम्ही सांगा मनसेने कोणत आंदोलन अर्धवट सोडलं. आजवर मनसेने कोणतही आंदोलन सोडून दिलं नाही. मनसेच्या टोलनाक्यांच्या आंदोलनांमुळे राज्यातील ६५-७० टोलनाके बंद झाले. पाकिस्तानी कलाकारांना मनसेने हुसकावून लावलं ना. रझा अकादमीच्या विरोधात फक्त मनसे उभी राहिली. पण तुम्ही सांगा तुमच्या अंगावर आंदोलनाची एकतरी केस आहे का, असा थेट सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला.

Raj Thackeray
भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी मन जिंकलं! 'त्या' चौघांना थेट नेत्यांच्या शेजारी बसवलं...

औरंगाबाद शहरातल्या समस्यांचा विचार कोणी करणार आहेत की नाही, परवा दिवशी एकजण म्हणाले, संभाजीनगरच नामांतर झालं काय आणि न झालं काय मी बोलतोय ना, अरे कोण तू, असा संतप्त सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव न घेता राज ठाकरेंनी केला. औंरगाबाद शहराचे तातडीने नामांतर करा. औरंगाबाद नामांतरणाचा एक तरी प्रश्न मिटवलात का, नामांरणाच्या मुद्द्यावरुन मते मागता मग तिथे एमआयएमचा खासदार झालाच कसा, मतांच्या ध्रुवीकरणासाठी सेनेच्या राजकारणामुळे निजामाच्या अवलादी इथ वळवळु लागल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरद पवार म्हणायचे मी आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे दिवसा भांडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो. असं बोलून शरद पवार बाळासाहेब ठाकरेंची विश्वासार्हता घालवत आहेत. पण शिवसेनेला अक्कल नाहीये.आपण कोणासोबत आहोत. शिवसेनेला त्याचं काहीही नाही आता शिवसेनेला सत्ता सर्वकाही वाटत आहे.

औंरगजेबाच्या कबरीवर एमआयएमचा खासदार गेल्यानंतर महाराष्ट्र खवळेल असं वाटतं असेल पण महाराष्ट्र शांत, कोणतेही पडसाद उमटले नाहीत. शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो, का असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. एमआयएमचा खासदार औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतो आणि महाराष्ट्र थंड कसा, त्याच्या कबरीचा विस्तार होतोय आणि आपण थंड कसं. आम्हाला लाजच वाटत नाही, काही होत नाही, राग येत नाही, सगळे थंड गोळे? अफजलच्या कबरीसाठी फंड येतो कुठून, आपल्याला राग न येण्याने देश ९०० वर्षे पारतंत्र्यांत. गझवीपासून ब्रिटीशांपर्यंत प्रत्येकाने देशावर राज्य केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com