"मृत्यूंजय ते छावा अन् युगंधर" : राज ठाकरेंकडून ५० हजारांची तब्बल २०० पुस्तक खरेदी

Raj Thackeray | Book | राज ठाकरे रमले बुक गॅलरीमध्ये
Raj Thackeray | Book
Raj Thackeray | Booksarkarnama

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ४ दिवसांच्या पुणे (Pune) दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी काल अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये जावून मनसोक्त पुस्तक खरेदीचा आनंद लुटला. त्यांची वाचनाची आवड सर्वश्रुत आहे. यावेळी त्यांनी आवड जपत मृत्यूंजय, छावा, युगंधर अशी ५० हजारांची तब्बल २०० पुस्तक खरेदी केली. विषेश म्हणजे या पुस्तक खरेदीवेळी त्यांनी कोणाचाही व्यक्तय खपवून घेतला नाही. प्रतिक्रिया घ्यायला आलेल्या पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींवर चिडले.

राज ठाकरे यांनी काल विविध विषयांवरील २०० हून अधिक पुस्तकं खरेदी केली. यामध्ये गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, वा.सी.बेंद्रे यांच्या रियासतचे सर्व खंड, मृत्यूंजय, छावा, युगंधर या पुस्तकांच्या डिलक्स आवृत्ती यासोबतच अनेक ऐतिहासिक, आत्मचरित्र आणि कला क्षेत्रातली पुस्तकं त्यांनी खरेदी केली आहेत.

Raj Thackeray | Book
भाजपच्या हुकूमाच्या पत्त्यांना शिवसेनेचे प्रत्यूत्तर; "आमची आकडे आणि मोड दोन्हीची तयारी!"

याशिवाय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती (Raja Shiv Chhatrapati by Babasaheb Purandare) या चरित्रग्रंथात प्रसिद्ध चित्रकार दिनानाथ दलाल यांनी रेखाटलेल्या चित्रांचा संग्रह महाराज या नावाने प्रकाशित कऱण्यात आला आहे. त्याचीही माहिती घेतली.

राज ठाकरे यांच्या या पुस्तक खरेदीबाबत बोलताना अक्षरधारा बुक गॅलरीचे प्रमुख रमेश राठीवडेकर माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले, राज ठाकरे यांनी आजवर आमच्या दालनास अनेक वेळा भेट दिली आहे. ते नेहमीच विविध प्रकारची पुस्तक खरेदी करतात. मात्र आज त्यांनी दीड तासात जवळपास २०० हून अधिक पुस्तके खरेदी केली आहेत.

Raj Thackeray | Book
जगू द्याल की नाही?, चिडलेल्या राज ठाकरेंनी सुनावले

यामध्ये मराठी रियासत, मृत्युंजयची नवीन आवृत्ती यासह अनेक ऐतिहासिक,आत्मचरित्र, कला क्षेत्रातील पुस्तकांची त्यांनी खरेदी केली आहे. जवळपास ५० हजारांची त्यांनी खरेदी केली. तसेच ठाकरे यांच्या सोबत दीड तास विविध विषयांवर यावेळी चर्चा देखील झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com