Raigad encroachment : स्वराज्याची राजधानी `रायगड` अतिक्रमणाच्या विळख्यात

दिवशी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांतील वाढत्या ई सिगारेटच्या गंभीर व्यसनाचा त्यांचा दुसरा प्रश्नही पटलावर आला होता.
Raigad encroachment
Raigad encroachment

PCMC News : आजारी असल्याने राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter session) उपस्थित न राहताही चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी (३० डिसेंबर) सूप वाजलेल्या या अधिवेशनात दमदार कामगिरी केली. मतदारसंघातील साडेबारा टक्के जमिन परताव्याचा आणि मेट्रो विस्तार तसेच राज्यातील विद्यार्थ्यामधील ई सिगारेटचे वाढते व्यसन आणि प्रमुख किल्यांवर मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण असे त्यांचे चार तारांकित प्रश्न पटलावर आले.

स्वराज्याची राजधानी रायगड आणि मावळ तालुक्यातील लोहगडसह राज्यातील पाच प्रमुख किल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याकडे आ. जगतापांसह नऊ आमदारांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नाच्या उत्तरात या गडांवरील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची कबुली राज्य सरकारने विधानसभेत आज दिली. सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून हे अतिक्रमण काढण्यातील कमकुवत दुवेही समोर आले.

Raigad encroachment
BJP Finance Source : राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्येही भाजपच नंबर वन !

मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेल्या पाचपैकी रायगड,कुलाबा,लोहगड हे तीन किल्ले हे केद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने तेथे झालेले अतिक्रमण लगेच काढण्यात राज्य सरकारला मर्यादा येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाला विनंती करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. तर, माहीम आणि विशाळगड हे राज्य संरक्षित स्मारक असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईतील माहिम किल्यावरील अतिक्रमण हे मुंबई महापालिकेकडून,तर विशाळगडावरील हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने राज्य पुरातत्व विभागाकडून करण्यात येत आहे,असे सरकारी छापाचे ठोस नसलेले उत्तर मुनगंटीवारांनी दिले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा साडेबारा टक्के परतावा हा चाळीस वर्षानंतरही मिळाला नसल्याने त्याबाबत आ. जगताप यांनी विचारलेला तारांकिंत प्रश्न या अधिवेशनात बुधवारी (ता.२८) लागला.त्याच्या आदल्याच दिवशी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांतील वाढत्या ई सिगारेटच्या गंभीर व्यसनाचा त्यांचा दुसरा प्रश्नही पटलावर आला होता. तर, या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच पिंपरी ते पुणे आणि हिंजवडी ते चाकण या मेट्रोच्या रखडलेल्या विस्ताराबाबत त्यांचा प्रश्न लागला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in