Anurag Thakur: पराभवाच्या नैराश्यातून राहुल गांधींकडून सैनिकांचे खच्चीकरण; अनुराग ठाकूरांची टीका

Rahul Gandhi: सत्तेत असताना काँग्रेसने सैन्य दलाचे मजबुतीकरण केले नाही
Anurag Thakur, Rahul Gandhi
Anurag Thakur, Rahul GandhiSarkarnama

BJP News: गुजरातसह ईशान्य भारतातील तीन राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेस नेस्तनाबूत झाली. त्या नैराश्यातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन सैनिकांचे मनोबल खच्ची होईल, असे वक्तव्य केले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नसून, ती भारत तोडो यात्रा ठरली आहे, असे त्यांच्या वर्तनुकीतूनच दिसून येत असल्याची टीका केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

भाजपच्या पुणे शहर (Pune BJP) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले, "काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांवर अन्याय केला जात आहे. राहुल गांधींनी परदेशात आपल्या देशातील सैनिकांचे मनोबल कमी होईल, असे वक्तव्य केले. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात तैनात भारतीय जवानांना ते 'ऑक्यूपाइड आर्मी ' असे म्हणाले. असे असेल तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशला हा भूभाग भारताचा नाही का, हे काँग्रेसने (Congress) स्पष्ट करावे."

Anurag Thakur, Rahul Gandhi
Hasan Mushrif News: मुश्रीफ कुटुंबीयांची तब्बल साडेनऊ तास चौकशी; कागदपत्रांच्या गठ्ठ्यांसह 'ईडी'चं पथक बाहेर

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यांची भारत जोडो यात्रा नसून भारत तोडो यात्रा असल्याचे त्यांच्या वागण्यातून वाटत आहे. गुजरात, त्रिपुरा, नागालँड, मेघालय येथील निवडणुकीत मध्ये काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत झाला आहे. पुलवामा घटना केवळ एक कार अपघात असल्याचे सांगत सैनिकांचा अपमान करत आहेत. सर्जिकल स्ट्रईकचे पुरावे मागून सैनिकांचे मनोबल खच्चीकरण केले.

ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचेही कौतूक केले. ते म्हणाले, "काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी सैन्य दलाचे मजबुतीकरण केले नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांनी सैन्यदलाचे मनोबल वाढविले आहे. तसेच संरक्षण विभागाचे अद्ययावतीकरणही सुरू केले आहे. त्यामुळे जगात भारताबद्दल आत्मविश्‍वास तयार झाला आहे."

Anurag Thakur, Rahul Gandhi
Women’s Commission : वडिलांनीच लैंगिक शोषण केलं; महिला आयोग अध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ

आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगवान

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ)तर्फे ‘युवा २० कंसल्टेशन’चे आयोजन भारताच्या ‘जी- २०’ अध्यक्षते अंतर्गत केले आहे. तेथे ठाकूर यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगवान असल्याचा दावा केला.

ते म्हणाले, "भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी व सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपल्या अर्थव्यवस्थेने मोठ्या प्रमाणात प्रगती करत जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपर्यंतचा पल्ला गाठला आहे. गेल्या आठ वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी 'स्टार्टअप इकोसिस्टम' बनला आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com