नगरच्या नामांतराला भाजपचे मंत्री विखे पाटलांचा विरोध : म्हणाले नामांतरापेक्षा...

अहमदनगर जिल्ह्याच्या नामकरण करण्याचा अंतिम निर्णय झाला नाही.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

पुणे : अहमदनगर (nagar) जिल्ह्याच्या नामकरण करण्याचा अंतिम निर्णय झाला नाही. नगर जिल्ह्याच्या नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अशा शब्दांत महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नगर जिल्ह्याच्या नामकरणापेक्षा विकासावर भर देण्याबाबत भाष्य केले. (Radhakrishna Vikhe Patil's opposition to Ahmednagar name change)

भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी नामांतरापेक्षा विकासाला महत्व द्या, असे आवाहन नगरच्या नामांतराची मागणी करणाऱ्या सहकारी आमदारांना केले. नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करावं, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तसेच, परभणी जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश भूमरे यांनी केली होती.

Radhakrishna Vikhe Patil
Jagtap-Tilak News : दुर्धर आजारातही पक्षनिष्ठा शिकविणारे दोन झुंजार नेते भाजपने १२ दिवसांत गमावले

नगर जिल्ह्याच्या नामांतराचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पण, नगर जिल्ह्याच्या नामांतर करण्यापेक्षा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे सांगून खुद्द भाजपचे मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनीच नगरच्या नामांतरास विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्याच्या विभाजनाचीही चर्चा होते. पण, हे सांगून आपण काय साध्य करतो आहोत. आम्ही नगरचा विकासाचा आराखडा तयार केला आहे. पर्यटन, औद्योगिक असे अनेक विषय आहेत.

Radhakrishna Vikhe Patil
Solapur News : काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या भावाविरोधात आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल

माझी अपेक्षा आहे की बाहेरच्या लोकांनी येऊन भाष्य करण्यापेक्षा तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतली पाहिजे. नगर जिल्ह्यातील विकासाबाबत एकत्र येऊन सर्वांनी मुद्दे मांडले पाहिजेत. आमदार गोपीचंद पडळकर हे माझे मित्र आहेत. नगर जिल्हा नामांतराबाबत मी त्यांच्याशी बोलतो, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Radhakrishna Vikhe Patil
BJP News : राष्ट्रवादीतून आलेल्या आक्रमक महिला नेत्याला भाजपने दिले राज्याचे पद!

मुक्ता टिळक यांच्याबाबत विखे पाटील म्हणाले की, मुक्ता टिळक यांच्या निधनाने आम्ही दुःखी होतो. सभागृहात माझी आणि त्यांची ओळख झाली. महापौर असतानाही त्यांची माझी भेट झाली होती.अखेरपर्यंत त्या ध्येयवादी नेत्या होत्या. आजारी असतानासुद्धा त्या मतदानाला आल्या होत्या त्यांच्या निधनानंतर आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल विखे पाटील यांनी शोक व्यक्त केली. ते म्हणाले की, लक्ष्मणराव यांच्याशी माझा व्यक्तिगत स्नेह होता. त्यांची मध्यंतरी प्रकृती खालावली होती. आजारावर मात करतील, असं वाटलं होतं. ते मतदानालाही आले होते. जगताप हे कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व होतं. आज मित्र गेल्याचे दुःख आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in