अधिवेशनात पहिलाच प्रश्‍न पुरंदरचा; तरीही आमदार संजय जगताप गैरहजर

पटेल यांच्या प्रश्‍नावर फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नव्हते.
संजय जगताप

संजय जगताप

सरकारनामा

पुणे : पुरंदर तालुका (Purandar) तसेच पुणे जिल्ह्यातील (Pune District) सिताफळ बागांच्या नुकसानीचा विषय विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी पहिलाच प्रश्न उपस्थित करण्यात आला.पुरंदरचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी हा प्रश्‍न दिला होता.मात्र,अधिवेशनात प्रत्यक्ष प्रश्‍न उपस्थित करताना आमदार जगताप गैरहजर होते. आमदार अमिन यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला.

<div class="paragraphs"><p>संजय जगताप</p></div>
‘टीईटी’च्या गेल्या महिन्यात झालेल्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय

पटेल यांच्या या प्रश्‍नावर फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नव्हते.शेतकऱ्यांचे थोडेफार नुकसान झालेय असे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सिताफळाच्या बागा मोठ्याप्रमाणात आहेत.सलग तीन वर्षे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.पुरंदरसह सिताफळ बागांच्या सर्वच शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी आमदार पटेल यांनी केली.त्यावर बोलताना मंत्री भुमरे यांनी थोडेफार नुकसान झालेय असं सांगत पीक विम्यातून शेतकऱ्यांना मदत झाल्याचे सांगितले.

<div class="paragraphs"><p>संजय जगताप</p></div>
टीईटी २०१८ च्या परीक्षेतही झाला होता घोटाळा

राज्यात पुरंदर तालुक्यात सिताफळ बागांचे क्षेत्र सर्वाधिक आहे.सलग तीन वर्षे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तीन वर्षात ठोस स्वरूपाची मदत झालेली नाही.शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा आहे. मात्र, विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतरदेखील मंत्र्यांकडून ठोस स्वरूपाची आश्‍वासन मिळाले नाही. केवळ पीक विमा कंपन्यांचे नाव सांगत मंत्री भुमरे यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी प्रश्‍नोत्तराचा तास झाला.राज्य सरकारची बारा विधेयके दाखल करून घेण्यात आली.राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या वाळू तस्करीचा विषय उपस्थित करण्यात आला.त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे राज्य सरकारचे मोठे महसुली उत्पन्न बुडत असून एकट्या गेवराई तालुक्यात आठजणांचा बळी गेल्याचा मुद्दा गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी उपस्थित केला.वाळू माफियांना आवर घालण्यासाठी राज्य सरकारने व्यापक विचार करून मोका कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com