पुरंदर विमानतळ खेडला जाणार का?

चाकण, खेडमधील चार जागांना हिरवा झेंडा न मिळाल्याने अखेरीस खेड तालुक्यात होऊ घातलेला विमानतळ पुरंदरला (Purandar Airport) गेले होते.
पुरंदर विमानतळ खेडला जाणार का?

Airport New

sarkarnama

पिंपरीः पुरंदर (जि. पुणे) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेत केलेला बदल राज्य सरकारच्या अंगलट आला आहे. कारण नवीन जागेला संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील हा दुसरा विमानतळ खेड तालुक्यातच करण्याची जोरदार आग्रही मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी केली आहे.

अडवा आणि एकमेकांची जिरवा या केंद्र व राज्य सरकारच्या भुमिकेची ही पुढची पायरी असल्याची चर्चा यातून रंगली आहे. दरम्यान, यावरून भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदारसंघासह पिंपरी-चिंचवडचे स्थानिक नेते पुन्हा भिडण्याची जोरदार शक्यता आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून त्यातही शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून यानिमित्ताने पुन्हा केंद्रावर जोरदार टीका होण्याचा संभव आहे.

चाकण, खेडमधील चार जागांना हिरवा झेंडा न मिळाल्याने अखेरीस खेड तालुक्यात होऊ घातलेला विमानतळ पुरंदरला (Purandar Airport) गेले होते. त्यावरून खेडमध्ये जोरदार राजकारण झाले. शिवसेनेच्या तत्कालीन खासदारांच्या विरोधामुळे तो हलल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला.

दरम्यान, खेड तालुक्यात या विमानतळाच्या संभाव्य जागेच्या परिसरात शेकडो एकर जागा घेतलेल्यांचा त्यामुळे मोठा हिरमोड झाला.तसेच खेड तालुक्यातील जमिनीचे वाढलेले भावही खाली आले.दरम्यान, जागेच्या प्रश्नावरून कायम चर्चेत असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली. त्यामुळे आता नव्याने जागेचा शोध घेताना पिंपरी-चिंचवडलगतच्या खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

<div class="paragraphs"><p>Airport New</p></div>
मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार ; महिलेच्या केसांवर थुंकले जावेद हबीब

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने नवीन जागेला साईट क्लिअरन्स म्हणजे जागा परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अर्थात राज्य सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तत्कालिन फडणवीस सरकारने पुरंदर येथील जागेची निवड अंतीम केली होती. त्याला संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली होती. मात्र, आघाडी सरकार आल्यानंतर त्या जागेत बदल करण्यात आला. नवीन बदलांचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. पण, संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे.

आमदार लांडगे यांनी पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्टयात हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे असल्याचे सांगितले. गेल्या १० वर्षांपासून विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रातील तळेगाव-चाकण- रांजणगाव इंडस्ट्रिअल हब आणि पिंपरी-चिंचवडमधील रेसिडेन्सिअल कॉरिडॉरच्या दृष्टीने भविष्यातील २५ वर्षांचा विचार करता खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणे गरजेचे आहे, अशे ते म्हणाले. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.