शंभर जागा जिंकण्याची वल्गना करणाऱ्यांना पुणेकर घरी बसवणार; जगताप-देशमुखांचा विश्‍वास

निमित्ताने दोन्ही पक्षातील समर्थकांमध्ये महापालिकेतील (PMC) सत्तेवरून आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे.
Prashant Jagtap-Pradeep Deshmukh
Prashant Jagtap-Pradeep DeshmukhSarkarnama

पुणे : पुणे महापालिकेत शंभर जागा जिंकून फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांना वाढदिवसाची भेट देण्याची वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला (Bhartiya Janata Party) पुणेकर यावेळी घरी बसवतील , असा विश्‍वास राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) काँग्रेसच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ex-Deputy chief Minister Ajit Pawar) यांचाही आज वाढदिवस असतो. या निमित्ताने दोन्ही पक्षातील समर्थकांमध्ये महापालिकेतील सत्तेवरून आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे.

Prashant Jagtap-Pradeep Deshmukh
'जिलेबी कितीही आडवळणी असो'; अमृता फडणवीसांच्या उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आज सकाळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचादेखील आज वाढदिवस आहे. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने गुरूवारी रात्री केक कापून पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, शंभर जागा जिंकण्याच्या मुळीक यांच्या निर्धाराला शहराध्यक्ष प्रशांत जगताप व प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी उत्तर दिले आहे.

Prashant Jagtap-Pradeep Deshmukh
`कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांचा निर्णय चुकला.. पश्चाताप होईल!`

गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीने सत्तेत असूनदेखील पुणेकरांसाठी काहीही केलेले नाही. सत्तेचा उपभोग घेण्यापलिकडे भाजपाकडून काहीही झालेले नाही. गेल्या महिनाभरात पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांवरून भाजपाचे कर्तृत्व सिद्ध झाले आहे, अशी टीका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. स्मार्ट सिटी, नदीकाठ सुधार प्रकल्प तसेच जायकाच्या प्रकल्पात काहीही झालेले नाही. त्यामुळे या पाच वर्षात भाजपाकडून पुणेकरांची केवळ फसवणूक झाली आहे, अशी टीका प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केली. शंभर जागा जिंकण्याची वल्गना करणाऱ्यांना पुणेकर यावेळी घरी बसवणार आहेत, असा विश्‍वास जगताप व देशमुख यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुचनेनुसार वाढदिवसानिमित्त कुणीही माध्यमांमध्ये जाहिरात दिली नाही. मात्र, शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात मोक्याच्या ठिकाणी होर्डींग लावण्यात आली आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक देखील यात मागे नाहीत. माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी होर्डिंग शहरात मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आली आहेत. पवार व फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये होर्डींग लावण्यावरून जणू स्पर्धाच लागली आहे की काय अशा पद्धतीने जागोजागी होर्डींग लावल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in