UPSC Civil Services Exam Result: वडिलांच्या कष्टाला मिळाला न्याय; भाजी विक्रेत्याच्या मुलाची आभाळाला गवसणी !

UPSC Result 2023 : वडिलांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी केले प्रयत्न
Siddharth Bhange
Siddharth Bhange Sarkarnama

UPSC Result : स्पर्धा परीक्षा करताना सामान्य कुटुंबातील असमान्य मुलांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. अनेक अडचणींवर मात करून त्यांना खडतर प्रवास पार करावा लागतो. असाच खडतर प्रवास पुण्यातील सिद्धार्थ भांगे याने दुसऱ्याच प्रयत्नात पार केला आहे. 'यूपीएससी' परीक्षा पास झाल्यानंतर वडिलांच्या कष्टाला न्याय दिल्याची भावना त्याने व्यक्त केली. UPSC Civil Services Exam Result 2022

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी (ता. २३) जाहीर झाला. पुण्यातील खराडी भागातील सिद्धार्थ भांगे देशभरात ७०० रँकने उतीर्ण झाला आहे. त्याने एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या यशाबद्दल माहिती दिली. या यशावर सुरुवातीला माझ्यासह कुटुंबियांचाही विश्वास बसला नसल्याचे प्रांजळपणे सिद्धार्थने सांगितले. सिद्धार्थ म्हणाला, "माझ्या खूप वर्षांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे. त्यामुळे आता मी खूप खुश आहे. या यशाबद्दल माझ्यासह घरच्यांचाही विश्वास बसला नाही."

Siddharth Bhange
Rahul Gandhi News : नवा वाद ; काँग्रेसकडून राहुल गांधींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना..? काय आहे प्रकरण?

वडिलांच्या कष्टाला न्याय दिला. त्यांच्या कष्टातूनच प्रेरणा घेतल्याची भावना सिद्धार्थने यावेळी व्यक्त केली. तो म्हणाला, "कुटुंब चालविण्यासाठी वडील भाजी विक्री करायचे. त्यानंतर त्यांनी रिक्षा चालविण्यास सुरूवात केली. वडिलांच्या कष्टातूनच प्रेरणा घेतली. त्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी मीही खूप परिश्रम घेतले. त्यांच्या कष्टाचे चीज करणे हेच माझ्यापुढे आव्हान होते. ते मी प्रामाणिकपणे पेलण्याचा प्रयत्न केला. त्याचेच हे फळ आहे." (UPSC)

दुसऱ्या प्रयत्नात उतीर्ण झालो असलो तरी त्यामागे खूप वर्षांची मेहनत असल्याचे सिद्धार्थने यावेळी सांगितले. तो म्हणाला, "अकारावीत असतानाच 'यूपीएससी' करण्याचे ठरविले होते. वाडिया महाविद्यालयातून राज्यशास्त्रातून 'बीए'ची पदवी घेतली. कोविड काळापासूनच अभ्यासाला सुरुवात केली. कुणालाही एका रात्रीत यश मिळत नाही. त्यासाठी प्रामाणिक कष्टासह सयंमाची खूप गरज लागते. 'सोशल मीडिया'मुळे तरुणांमध्ये सयंमाचा आभाव जाणवत आहे. मी सोशल मीडियापासून दूर राहिलो."

Siddharth Bhange
UPSC Result : 'युपीएससी'त 'सारथी'चे यश ; 17 उमेदवार प्रशासकीय सेवेसाठी सज्ज !

यावेळी सिद्धार्थने 'आयएएस' (IAS) होण्याचे स्वप्न असल्याचेही सांगितले. तो म्हणाला, "आता मिळणाऱ्या पोस्टवर काम करताना १०० टक्के देणार आहे. पुढे 'आयएएस' होण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. 'आयएएस' झाल्यानंतरही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करणार असल्याचेही ठरविले आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com