पुण्याचे ‘झेड’पी सदस्य एका सुरात म्हणाले; ‘कभी अलविदा ना कहना’ !

पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ येत्या रविवारी (ता.२०) संपत आहे.
Member of Pune ZP
Member of Pune ZPSarkarnama

पुणे : जिल्हा परिषदेवर (Pune District Council) निवडून आलो आणि पाच वर्षे कधी सरली ते कळलंच नाही. कामाच्या ओघात सदस्यांचे प्रशिक्षणही झाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राहिलेले दोन दिवशीय प्रशिक्षण झेडपी प्रशासनाने महाबळेश्‍वर येथे आयोजित केले.या प्रशिक्षणाच्या समारोपाबरोबरच सदस्य म्हणून असलेला कार्यकाळ संपताना सर्वांनी एका सुरात 'कभी अलविदा ना कहना' गाणे गायिले आणि भावुक होत जिल्हा परिषदेच्या सभागृहाचा निरोप घेतला.

Member of Pune ZP
कात्रजच्या अध्यक्षांना ZPच्या माजी उपाध्यक्षांचे आव्हान; तर मामा-भाच्यांत कोण बाजी मारणार

पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ येत्या रविवारी (ता.२०) संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशिक्षणातच सदस्यांनी भावुक होत आणि मागील पाच वर्षात सभागृहात घडलेल्या बऱ्या-वाईट घटनांना उजाळा आणि एकमेकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, परतीचा प्रवास सुरु केला.गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषदेतील कोणाला ‘गोडबोले’ अधिकारी म्हणायचो?, झेडपीतील सर्वात सुखी सदस्य कोण ? कामांचा आणि प्रश्‍नांचा पाठपुरावा करण्यात नंबर वन कोण? आदी प्रमुख प्रश्‍नांची उत्तरे शोधणे, या आणि अशा अनेक प्रश्नांची आवाजी मतदानाने घेतलेली उत्तरे, पाच वर्षाचा कार्यकाल संपण्यास दोन दिवस बाकी असताना प्रशिक्षणाचा अतिरिक्त डोस होऊ नये म्हणून रंगलेली मैफील आणि अगदी ‘दुनिया बनानेवाले’पासून ते ‘कभी अलविदा ना कहना’ अशी विविध गाणी गात पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहातील नवव्या ‘बॅच’ने बाय-बाय केले.

Member of Pune ZP
कराडचे शिवराज मोरेंची युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

मागील दोन वर्षाचा कोरोना काळ ओसरल्याने या प्रशिक्षण समारंभाला स्नेहसंमेलनाचे स्वरूप आले. गेल्या पाच वर्षातील वाद-विवाद, पक्षीय वैचारिक मतभेद, मनभेद आणि सभागृहात एखाद्या विषयावरील चर्चेच्यावेळी झालेली खडाजंगी, हमरीतुमरी, राजकीय घडामोडी, हे सगळं विसरून महाबळेश्‍वर येथील निसर्गरम्य वातावरणात हिरवळीवरील झोक्यावर एकमेकाला झोके देत सर्वपक्षीय सदस्य खऱ्या अर्थाने एकदिलाने एकत्र आले होते.

Member of Pune ZP
कुणाल राऊत यांना भाजपने दिला सल्ला... वडीलांप्रमाणे....

ज्येष्ठ सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी ‘आपलं माणूस’ ही कविता सादर केली. बारामतीचे किरण आणि मीनाक्षी तावरे यांनी सादर केलेलं गाण्याला ‘वन्स मोअर’ची मागणी झाली. चांदण्या रात्री देखील ‘नाच रे मोरा...’ वर अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर आदींसह विवेक वळसे पाटील, पांडुरंग पवार, अभिजित तांबिले, मोहित ढमाले, देविदास दरेकर गुलाबराव पारखे, अमोल नलावडे, बापू सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी तर, मिळून साऱ्याजणी वैशाली पाटील, सुनीता गावडे, तुलसी भोर, तनुजा घनवट, रोहिणी तावरे, अलका धानिवले, दीपाली काळे, अरुणा थोरात, रूपा जगदाळे, यांनी चांगलाच ताल धरला. झिंगाटवर मात्र सगळ्यांची पावले थिरकली. काठी नं घोंगडे घेऊ द्या की रं, या गाण्यावर मोहित ढमाले आणि माजी सदस्य चंद्रकांत बाठे यांनी ‘डान्स’ केला.

गेल्या पाच वर्षातील सुखी सदस्य, दुःखी सदस्य कोण, मार्ग काढणारे अधिकारी, गोडबोले अधिकारी, चांगला ड्रेस कोड, मस्तमौला सदस्य ठरवणारी प्रश्नावली सर्वांना बोलतं करणारी ठरली. हवेलीतील सदस्या जयश्री पोकळे यांनी 'दुनिया बनाने वाले' गाणे सादर केले. सविता बगाटे आणि अमोल नलावडे यांनी खुसखुशीत अनुभव सांगितले. अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेताना सर्वांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com