PUNE ZP : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र ढमाले यांचे निधन

मुळशी धरण क्षेत्रातील ५२ गावांच्या मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते.
Rameshchandra Dhamale
Rameshchandra DhamaleSarkarnama

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र ढमाले (वय ८२) (Rameshchandra Dhamale) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (PDCC Bank) सलग २८ वर्ष संचालक म्हणून ते काम करीत होते. मुळशी विधानसभेची १९९० ची निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली होती.

Rameshchandra Dhamale
शिंदे सरकारचे चालले काय? भ्रष्ट अधिकारी पुन्हा सेवेत

मुळशी धरण क्षेत्रातील ५२ गावांच्या मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते. या संस्थेच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील माले, खेचरे व वांद्रे या गावात माध्यमिक शाळा सुरू केल्या. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम त्यांनी सुरू केले.

Rameshchandra Dhamale
Nitesh Rane : जास्त मस्ती कराल तर... नितेश राणेंचा इशारा

तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीत या ढमाले यांनी सुरू केलेल्या या संस्थेचा मोठा वाटा आहे. या संस्थेचे माले येथे तंत्रशिक्षण देण्यासाठी ‘आयटीआय’ सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. या ‘आयटीआय’चा तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना फायदा झाला. त्यांनी मुळशी धरण भागातील मुलांसाठी माले येथे सेनापति बापट शिक्षण संस्था स्थापन केली. तालुक्यात माले, वांद्रे, खेचरे येथे हायस्कूल सुरू केले. तसेच माले येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. संस्थेच्या मदतीसाठी ते परदेशातून देगी मिळवत असत. जिल्हा बँकेचे ते अठ्ठावीस वर्षे संचालक होते. मुळशी पंचायत समितीचे उपसभापती पदावर त्यांनी काम केले होते. जिल्हा परिषदेस 1986 साली पौड माले गटातून निवडून आले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी ते कृषी सभापती होते. त्यांनी मुळशी हवेली मतदार संघातून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उभारणीत त्यांची बहुमोल वाटा होता. पाच वर्षे ते कारखान्याचे संचालक होते. तालुक्यातील तरूणांना शिक्षण संस्था व जिल्हा बँकेत नोकरी मिळवून दिल्या. कातकरी व आदिवासी समाजाला मदत करण्यात त्याचा पुढाकार असे.

तालुक्यात ऐंशीच्या दशकापासून माजी खासदार विदुरा नवले, अशोक मोहोळ, दिवंगत माजी सभापती तुकाराम हगवणे, बबनराव नागरे, पांडुरंग राऊत तालुक्याचा राजकीय कारभार पहात होते. त्यावेळी ढमाले यांचा तालुक्याच्या राजकारणात मोठा सहभाग होता. सुसंस्कृत, सरळ व सुस्वभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जात होते. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी त्यांची जवळीक होती.

मुळशी तालुक्तात सर्व पक्षातील नेते-कार्यकर्त्यांशी अत्यंत चांगला संपर्क हे ढमाले यांचे वैशिष्टय होते. जिल्हा बँकेत सलग २८ वर्षे ते संचालक म्हणून काम पाहात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com