Zilla Parishad News: आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पुणे जिल्हा परिषदेने दाखवला हिसका

Pune Zilla Parishad : ग्रामपंचायतीच्या निधीतून १० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर
Pune Zilla Parishad
Pune Zilla Parishadsarkarnama

Pune Zilla Parishad : आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी ग्रामविकास अधिकार्‍यावर पुणे जिल्हा परिषदेने थेट सक्तीने सेवानिवृत्तीची कारवाई केली आहे. यवत (ता. दौंड) ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्राम विकास अधिकारी दत्तात्रेय केकाण यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच अपहाराची दहा लाखांची रक्कम त्यांच्या निवृत्तिवेतनातून वसूल करणाचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिला आहे.

आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप विभागीय चौकशीत संबधित ग्रामविकास अधिकार्‍यावर सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर पुणे जिल्हा परिषदेमधील एखाद्या कर्मचाऱ्याला अशी सक्तीने सेवानिवृत्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे.

Pune Zilla Parishad
Chitra Wagh Vs Urfi Javed : राजकारण तापलं! उर्फीच्या तक्रारीनंतर महिला आयोगाचे मुंबई पोलिसांना आदेश

नेमकं प्रकरण काय?

यवतचे (ता. दौंड) तत्कालीन ग्रामविकास अधिकारी केकाण यांच्याविरोधात विविध आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या आरोपांची चौकशी करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने केली होती. या आदेशानुसार, केकाण यांची विभागीय चौकशी करण्यात आली. तर या झालेल्या चौकशीत केकाण यांच्यावरील आरोप सिद्ध झाले असल्याचे समोर आले आहे.

यवत ग्रामपंचायतीच्या निधीतून तब्बल १० लाख ८५ हजार ८७६ रुपयांचा अपहार झाल्याचे या चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सक्तीने सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच त्यांच्यावर गावातील विकासकामे करताना विहित पद्धतीचा अवलंब न करणे, निधीचा हिशोब व्यवस्थित न देणे, कर्तव्यात कसूर करणे यासह आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

Pune Zilla Parishad
Jalna Political : खोतकरांच्या जावयाचा `झोल`, अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल..

तसेच ग्रामपंचायतीच्या निधीतून केलेला खर्च, संतुलित ग्राम योजना खर्च, इमारत बांधकामाचे पूर्णत्वाचे दाखले नसताना घराच्या नोंदी करणे तसेच बेअरर चेकद्वारे रकमा प्रदान केल्याचा खुलासा सादर न करणे असे अनेक तथ्ये विभागीय चौकशीत आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर सक्तीने सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या कारवाईविरोधात संबंधित ग्राम विकास अधिकारी केकाण यांना विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे अपिलाद्वारे दाद मागता येणार आहे. त्यामुळे आता संबंधित ग्राम विकास अधिकारी हे विभागीय आयुक्तांकडे अपिल करणार का? याबाबत अद्याप काही सांगण्यात आलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com