Shiv sena : कात्रजमध्ये पुन्हा शिंदे -ठाकरे गट आमने-सामने येणार ; उदय सामंतांचे आव्हान

पुण्यातील कात्रज चौकात ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून उदय सामंतांवर प्राणघातक हल्ला झाला होता.
Uday Samant
Uday Samantsarkarnama

पुणे: माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant)यांच्यावर तीन दिवसापूर्वी पुण्यातील कात्रज चौकात ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून प्राणघातक हल्ला झाला होता. त्याच चौकात जाहीर सभा घेऊन ठाकरे गटाला चोख उत्तर सामंत देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे येत्या काही दिवसात कात्रजमथ्ये पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने येणार असल्याचं दिसते. (Uday Samant latest news)

उदय सामंत (uday samant)यांच्या गाडीवर काही दिवसापूर्वी शिवसैनिकांनी (shivsena) हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे (sanjay more) यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला असला तरी शिवसैनिकांचा आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट होता. मात्र, तानाजी सावंत यांची गाडी समजून त्यांनी उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. शिवसैनिक तानाजी सावंत यांना शोधत होते, मात्र ते सापडले नाहीत.

Uday Samant
पुणे, पिंपरी चिंचवडकरांच्या खिशाला कात्री; रिक्षा प्रवास महागला : असे आहेत नवे दर

याबाबत तानाजी सावंत म्हणाले, "या बाबत आपण ४ ते ८ दिवसात प्रतिक्रिया देऊ. आमचे कार्यकर्त्यच याबाबत रिअॅक्शन देतील," असा सूचक इशारा तानाजी सावंत यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. "जशास तसे उत्तर देण्यात येईल," असाच अर्थ तानाजी सावंत यांच्या विधानातून निघतो.

"आम्हाला वाटलं तानाजी सावंत आहेत, म्हणून आम्ही ही गाडी अडवली, पण ती उदय सामंत यांची गाडी होती. तानाजी सावंत हे गद्दार असून ते पळून गेले आहेत. पुण्यात शिंदे गटातील आमदार दिसले तर त्यांना मारहाण करु," असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

तानाजी सावंत यांच्या विधानानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट एकमेंकासमोर उभे टाकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसैनिकांनी सामंत यांच्या कारची मागची काच फोडली होती. यात हल्ल्यामुळे कारमधील एकजण जखमी झाला होता. प्रकरणी उदय सामंत यांनी तत्काळ पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com