पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकांचा आज निकाल : कोण मारणार बाजी, भाजप की मविआ?

Pune University : मतदारांची संख्या दुप्पट, निकालाला विलंब होण्याची शक्यता.
Pune University :
Pune University :Sarkarnama

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phue Pune university) सिनेट निवडणुकीसाठी मतदान पार पडले. (SPPU) आज मंगळवारी (ता.२२) मतमोजणी सुरू झाली आहे. यासाठीची सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मतदारांची संख्या दुप्पट असल्याने, यंदा निकालाला अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Cinet Election)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या दहा जागा पदवीधरांमधून निवडून देण्यासाठी विद्यापीठाकडून रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. याची मतमोजणी २२ नोव्हेंबर सकाळी आठ वाजल्यापासून विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडासंकुल येथे सुरू झाली आहे. निकाल दुपारपर्यंत येण्यची शक्यता आहे. यामध्ये भाजपप्रणित पॅनेल आणि महाविकास आघाडीप्रणित पॅनेल आमने-सामने आहे.

Pune University :
राष्ट्रवादीने दिला राज्यपालांना थेट इशारा!

याबाबत माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, सर्व मतमोजणी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत होणार आहे. यासाठी साधारण १७ हजार चौरसफूट अशा भव्य क्रीडा संकुलात ७२ काउंटर तयार करण्यात आले आहे. विद्यापीठातील जवळपास ३०० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. मतमोजणीचे आकडे दर काही वेळाने मोठ्या पडद्यावर जाहीर करण्यात येतील.

मागील वेळी निकाल जाहीर होण्यासाठी पहाटेचे सहा वाजले होते या सर्व बाबी गृहीत धरून यंदा महिला आणि ज्येष्ठ कर्मचारी यांचा विचार करून व जास्तीत जास्त युवा कर्मचारी अधिकारी यात सहभागी केले आहेत.

Pune University :
Solapur News : सोलापूर शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत माजी आमदार सावंतांच्या पॅनेलची बाजी!

डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, मतमोजणी प्रक्रियेबाबत आम्ही सराव करत वेळेचा अंदाज घेऊन निकाल वेळेत लावण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. मागील वेळच्या तुलनेत दुप्पट मतदान झाल्यामुळे अधिक वेळ लागू शकतो, मात्र त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील

Pune University :
Sambhaji Brigade : 'बहुजन महापुरूषांची बदनामी करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी करा!'

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू म्हणाले, गेले अनेक महिने विद्यापीठातील अनेक अधिकारी व कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत काम करत आहेत. आतापर्यंत अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली आहे, मतमोजणी देखील योग्य पद्धतीने पार पडेल असा माझा विश्वास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in