भाजपमध्ये मी मस्त, निवांत ; कोणतीही चौकशी नाही, शांत झोप लागते..

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) कॉग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी आपण का भाजपमध्ये (bjp) आलो याचं उत्तर यावेळी दिलं
Harshvardhan Patil
Harshvardhan Patilsarkarnama

मावळ (पुणे) : माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील त्यांच्या मिश्किलभाषणामुळे प्रसिद्ध आहे. काही दिवसापूवी त्यांनी ''मी राजकारणात आलो नसतो तर अभिनेता झालो असतो,'' असे विधान केलं होतं. अशाच प्रकारचे विधान काल त्यांनी एका कार्यक्रमात केलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. मावळ परिसरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ''मला आता एका व्यक्तीने विचारले की तुम्ही भाजपमध्ये का गेले, त्यांना मी म्हटलं, 'हे तुम्ही तुमच्या साहेबांना विचारा. तर ते म्हणाले, 'तेवढं सोडून बोला', मी पण त्यांना सांगितलं की तेवढं सोडून विचारा.'' हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) कॉग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी आपण का भाजपमध्ये (bjp) आलो याचं उत्तर यावेळी दिलं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), माजी मंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

Harshvardhan Patil
राष्ट्रवादीने गंभीर आरोप केलेले NCBचे समीर वानखेडेंना पुन्हा मुदतवाढ

मावळ तालुक्यातील एका कार्यक्रमात भाषण देताना त्यांनी मिश्किलपणे महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. ''भाजपमध्ये मी मस्त अन् निवांत आहे, मला शांत झोप लागते. माझी कोणती चौकशी ही सुरू नाही,'' अशा शब्दात हर्षवर्धन पाटलांनी सध्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सुरु असलेल्या तपास यंत्रणाच्या चैाकशीबाबत कुणाचेही नाव न घेता निशाणा साधला.

समीर वानखेडेंना पुन्हा मुदतवाढ; पुढील सहा महिने NCB च्या विभागीय संचालकपदी कायम

मुंबई : राष्ट्रवादीने गंभीर आरोप केलेले NCBचे समीर वानखेडेंना पुन्हा मुदतवाढ र्थ नियामत विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (ncb sameer wankhede) यांना पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे एनसीबीच्या झोनल डिरेक्टरपदी वानखेडे पुढील सहा महिने कायम राहतील. समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे (ncb sameer wankhede)यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. समीर वानखडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांच्यावर पाळत ठेवण्याच्या घटनेबाबत मुंबई पोलिस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com