राण्या बाणखेले हत्याप्रकरणात कुख्यात गुंड संतोष जाधवसह साथीदाराच्या मुसक्या आवळल्या

सिध्दू मुसेवाला हत्याप्रकरणातही पंजाब पोलीस संतोष जाधवच्या शोधात होते.
Santosh Jadhav Latest Marathi News, Sidhu Moose Wala case news updates
Santosh Jadhav Latest Marathi News, Sidhu Moose Wala case news updatesSarkarnama

पुणे : एकलहरे-फकीरवाडी (ता.आंबेगाव) येथे ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले यांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष सुनील जाधव (वय २४, रा.पोखरी, ता.आंबेगाव) याला गुजरातमध्ये रविवारी अटक केली. त्याला रात्री उशिरा न्यायालयात हजर केल्यानंतर 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पंजाबमधील प्रसिद्ध गायक व कॉंग्रेसचे युवा नेते सिदधू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणातही जाधवचा सहभाग असल्याचा आरोप आहे. (Santosh Jadhav Latest News)

मुसेवाला यांची पंजाबमधील मन्सा जिल्ह्यात जवाहरके गावात मागील महिन्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील संशयित म्हणून जाधव व सिद्धेश उर्फ सौरभ उर्फ महाकाल हिरामण कांबळे (वय १९ रा.नारायणगाव ता.जुन्नर) या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. पुणे ग्रामीण पोलीस या दोन आरोपींच्या मागावर गेली अनेक महिने होते. (Goon Santosh Jadhav arrested by Pune police)

Santosh Jadhav Latest Marathi News, Sidhu Moose Wala case news updates
जिल्हाधिकाऱ्यांच्या आजारी गायीसाठी सात डॉक्टरांची ड्युटी; दिवसांतून दोनदा तपासणीचे आदेश

बाणखेले हत्या व मोक्का प्रकरणात पोलीस त्यांच्या शोधात होते. त्यातच मुसेवाला हत्याप्रकरणातही दोघांची नावे समोर आल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला होता. या दोघांच्या शोधासाठी पंजाब पोलीसही पुण्यात आले होते. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी कांबळे याला काही मागील आठवड्यातच अटक केली होती.

त्यानंतर संतोष जाधव यांच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याला गुजरातमध्ये अटक केली. त्याचा साथीदार नवनाथ सुर्यवंशी यालाही अटक झाली आहे. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जाधव व कांबळे या दोघांच्या अटक करण्यात पोलिसांना यश आल्याने मुसेवाला हत्याप्रकरणातही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील संशयित आरोपीचे कनेक्शन आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात असल्याचे उघड झाल्याने पोलीस यंत्रणेसह परिसरात खळबळ उडाली आहे. बाणखेले हत्येतील जाधव व कांबळे यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण शाखेचे अशोक शेळके, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्यासह तीन पथके कार्यरत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com