पुण्यात दहा महिन्यातील सर्वात कमी मृत्यूची नोंद ऑक्टोबरमध्ये

दोन मे रोजी कोरोनाच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. त्या दिवशी शहरात ९३ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
Rajesh tope
Rajesh topeSarkarnama

पुणे : दीपावलीच्या पहिल्या दिवशी पुणेकरांसाठी सर्वांत आनंदाची बातमी आहे. गेल्या दहा महिन्यांमधील कोरोनाच्या नीचांकी मृत्यूची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली. एकूण मृत्यूपैकी एक टक्का मृत्यू या महिन्यात झाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

पुण्यात गेल्या वर्षी ३० मार्चला कोरोनाचा पहिला मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या १९ महिन्यांमध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत नऊ हजार ७४ रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. त्यापैकी चार हजार ४४३ रुग्णांचा मृत्यू गेल्या दहा महिन्यांमध्ये झाला. म्हणजेच एकूण मृत्यूपैकी ४९ टक्के कोरोनाबाधितांचा जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मृत्यू झाला. या भीषण संकटातून आपण आता बाहेर पडत असल्याचे आशादायक चित्र निर्माण होत आहे. कारण या महिन्यात आतापर्यंत कोरोनाने सर्वांत कमी मृत्यू झाले आहेत. गेल्या ३१ दिवसांमध्ये कोरोनाच्या ४५ मृतांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे.

Rajesh tope
‘आप’चे मुकुंद किर्दत म्हणतात; निवडणुकीच्या तोंडावर हे खेळतायेत नुरा कुस्ती

असे होते ३१ दिवस...

- सात दिवस शून्य मृत्यू

या महिन्यातील सात दिवसांमध्ये कोरोनाच्या एकाही मृत्यूची नोंद महापालिकेत झाली नाही. गेल्या १९ महिन्यांमधील हा असा पहिला महिना ठरला.

- सात दिवस एका मृत्यूची नोंद

शहरात गेल्या ३१ दिवसांपैकी सात दिवसांमध्ये एका रुग्णाचा मृत्यू नोंदला गेला. कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा अनुभव पुण्यातील डॉक्टरांना आला आहे. त्यामुळे मृतांची संख्या कमी करण्यात त्यांना यश आले आहे.

- १३ दिवसांत प्रत्येकी दोन मृत्यू

शहरात १३ दिवसांमध्ये प्रत्येक दोन मृत्यू झाले. त्यामुळे ४५ पैकी २६ मृत्यू या १३ दिवसांमध्ये झाले आहेत.

-चार दिवसांमध्ये १२ मृत्यू

कोरोनामुळे अवघ्या चार दिवसांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. चार दिवसांमध्ये प्रत्येक तीन जणांचा मृत्यू झाला. हे या महिन्यातील सर्वाधिक मृत्यू ठरले.

Rajesh tope
शेतकरी-एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ उद्या काळ्या फिती लावा

पुणे सावरतंय...

पुण्यात २ मे रोजी कोरोनाच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. त्या दिवशी शहरात ९३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ६६ रुग्ण पुण्यातील होते. उर्वरित २७ रुग्ण उपचारांसाठी पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील अशा भयंकर स्थितीतून पुणे शहर आता सावरत असल्याचे आशादायक चित्र दिसते.

........

दृष्टिक्षेपात पुण्यातील कोरोना

- कोरोनाबाधितांची संख्या : ५ लाख ४

हजार २८६

- कोरोनामुक्त झालेले रुग्ण : ४ लाख ९४ हजार ४८१

- एकूण मृत्यू : ९ हजार ७४

- गेल्या दहा महिन्यांमधील मृत्यू : ४ हजार ४४३

.............

महिना ........ कोरोना मृतांची संख्या

जानेवारी .......... १३३

फेब्रुवारी ............ ९१

मार्च ................ ४४७

एप्रिल ............... १४९५

मे .................. १४५९

जून ............... ३३२

जुलै ................ १७९

ऑगस्ट ........... १५९

सप्टेंबर ........... १०३

ऑक्टोबर ......... ४५

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com