Pune rain : अतिवृष्टीचा इशारा; ‘वर्क फ्रॉम होम`चे पालिकेचे आवाहन

Pune Rain Updates : पुणे व पिंपरी महापालिकेने उद्या (ता.१४) सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.
Pune Rain Updates
Pune Rain Updates

पुणे : येत्या ४८ तासात पुणे शहर आणि परिसरात अतिवृष्टीचा (Heavy rain in Pune) इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील आयटी कंपन्या तसेच खासगी आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सवलत द्यावी, (Work From Home) असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.(Pune Rain Updates)

Pune Rain Updates
केसरकर लायकीपेक्षा जास्त बोलू नका : लहान मुलगा म्हणाल्याने निलेश राणे खवळले..

दरम्यान, पुणे व पिंपरी महापालिकेने उद्या (ता.१४) सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. पुणे आणि परिसरामध्ये येत्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने शाळांना सुट्टी देण्याबरोबरच खासगी आस्थापनांना हे आवाहन केले आहे.

Pune Rain Updates
गुरूदक्षिणा म्हणून राष्ट्रवादीच्या मुंबईतील जागा वाढवा : भुजबळांचे आवाहन शिवसेनेला टोचणारे...

गेले तीन दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे खडकवासला धरण प्रकल्यात तीन दिवसात जवळपास सहा टीएमसी पाणी जमा झाले आहे. दहा तारखेला धरणात आठ टीएमसी पाणी होते. आज सायंकाळी १३.२१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शिवाय गेल्या तीन दिवसात सुमारे एक टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.

Pune Rain Updates
'आनंद दिघे अन् ....' : राजन विचारेंचा राजकीय मार्ग ठरला; गुरुपौर्णिमेदिवशी भूमिका स्पष्ट

गेल्या तीन दिवसांपासून खडकवासला, पानशेत, टेमघर व वरसगाव या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पहाटे पाच वाजल्यापासून पावसाने पुन्हा जोर धरला. आज दिवसभर प्रचंड पाऊस कोसळत आहे. पुणे शहरासोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरात पाऊस असल्याने खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून ९०५ क्यूसेक आणि मुठा नदीत १३ हजार १३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in