पुणे पूर्वपदावर :ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा तीन हजार सहाशेवर - Pune Pre-position: The number of active patients is over three thousand six hundred | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे पूर्वपदावर :ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा तीन हजार सहाशेवर

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

 जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रूग्णांचा आकडा थोडासा जास्त असला तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.

पुणे : पुण्यातील ॲक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या तीन हजार सहाशेवर आली आहे. आज नवे २९७ रूग्ण सापडले तर ५२९ रूण बरे होऊन घरी गेले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पुण्यातील हाताबाहेर गेलेली परिस्थिती आता रूळावर आली असून काही बंधनांसह पुण्यातील दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत.(Pune Pre-position: The number of active patients is over three thousand six hundred)

गेल्या काही दिवसात पुण्यातील रूग्णसंख्येत सातत्याने घसरण होत आहे. रूग्णसंख्या कमी झाल्याने पुण्यातील शनिवार-रविवारचा कडक लॉकडाऊन उठविण्यात आला आहे. आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या दिवशी सर्व व्यवहार सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत सुरू झाले आहेत. शनिवार व रविवारी इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून केवळ अत्यावश्‍यक सेवेसह भाजी-पाला दूधाची दुकाने उघहण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहराच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रूग्णांचा आकडा थोडासा जास्त असला तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्यावर्षी लॉकडाऊन उठवताना घाई करण्यात आल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ञ सांगत असल्याने यावेळी ती चूक राज्य सरकार पुन्हा करणार नाही. त्यामुळे रूग्ण कमी झाले तरी लगेच सर्व घटकांना सूट देण्यात आली नाही. व्यावसायिकांनाही वेळेच बंधन घालण्यात आले आहे. संभाव्य तिसरी लाट येणार नाही आणि आली तरी त्यावर नियंत्रण मिळविता आले पाहिजे, अशी तयारी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवर काळजी घेण्यात येत आहे.

पुण्यात काही मर्यादा घालून पीएमटी सेवा सुरू करण्यात आली आहे. सोमवारपासून सुमारे चारशे पीएमटी बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत.परिस्थितीचा अंदाज घेऊन यात आणखी वाढ करण्यात येणार आहे.पुण्यात लसीकरणानेदेखील गेल्या आठड्याभरात जोर धरला आहे. लसींचा पुरवठा होत असल्याने लसीकरणाची केंद्र वाढविण्यात आली आहेत. येत्या काळात यात आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे पुणे महपालिकेतील सूत्रांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख