गायकवाड पितापुत्राला डबल `मोक्का`, तरी पोलिसांना दिलाय धक्का!

अद्याप फरार असल्याने आश्चर्य़ व्यक्त होत आहे...
Gaykwad pitaputra
Gaykwad pitaputra

पुणे : अनधिकृत सावकारकी, खंडणी, सूनेचा छळ, जमीन बळकावणे अशा विविध गुन्ह्यांसाठी  पुणे पोलिसांनी फरार असलेल्या नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaykwad) व त्याचा मुलगा गणेश गायकवाड (Ganesh Gaykwad) यांच्या विरोधात मोक्काची (MOCCA) कारवाई आज केली. या आधी पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही गायकवाड विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. दोन्ही पोलिस आयुक्तांलयानी ही कारवाई केलेला गायकवाड पितापुत्र एकमेव असावेत. असा डबल मोक्का कारवाई होऊनही तो सापडत नसल्याने त्याने पोलिसांना धक्का दिला, अशी परिस्थिती निर्णाण झाली आहे. 

या कारवाईनंतर गायकवाडच्या संपर्कात असणारे तथाकथित अध्यत्मिक गुरू व राजकीय नेते आता पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत  पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या आधी मोक्काची कारवाई केली होती. त्यानंतर पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही तसेच पाऊल उचलले. यात नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध), सोनाली दिपक गवारे (वय 40), दिपक निवृत्ती गवारे (वय 45, दोघेही रा. गजानन महाराज मंदिराजवळ, शिवाजीनगर), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा.सर्वोदय रेसीडेन्सी, विशालनगर, पिंपळे निलख, मुळ रा. श्रीरामपुर, नगर), सचिन गोविंद वाळके, संदिप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अवैध खासगी सावकारी केल्याबाबतचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. प्रतिष्ठीत व महत्वाच्या व्यक्तींशी संबंध निर्माण करून गरजू व्यक्तींना बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देत, त्यांच्याकडून मुद्दल, व्याजासह पैसे घेण्याबरोबरच त्यांच्या मालमत्ता बळकावून बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

 मोक्कांअंगर्तत कारवाई व्हावी, यासाठीचा प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. त्यास पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी मंजुरी दिली.

आता पुणे पोलिसांच्या रडारवर अध्यत्मिक गुरू व राजकीय नेते आहेत.  पुणे पोलिसांना चुकारा देत गायकवाड फरार आहे. पोलिसांनी गायकवाडला अटक करण्यासाठी टीम तयार केल्या आहेत. त्यासाठी  पुढील काही दिवसांत अनेक लोकांची चौकशी पुणे पोलिस करण्याची शक्यता आहे. यात नाशिक जिल्ह्यातील एका माऊली म्हणवून घेणाऱ्या बुवाचा समावेश असल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com