गजा मारणे सुटला अन् मुलगा अडकला; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बलात्काराचा गुन्हा

कुख्यात गुंड गजानन मारणे (Gajanan Marne) याच्या मुलावर पुणे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
Gajanan Marne
Gajanan Marne Sarkarnama

पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे (Gajanan Marne) याच्या मुलावर पुणे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. प्रथमेश मारणे (Prathamesh Marne) याच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पीडितेचे अश्लील व्हिडीओ काढून तिला धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, याच महिन्यात गजा मारणे याची कारागृहातून सुटका झाली आहे.

प्रथमेश मारणे याने एका तरुणीशी मैत्री केली होती. नंतर त्याने संबंधित तरुणीसोबत शारिरीक संबंध ठेवले. तिचे अश्लील व्हिडीओ काढून तो तिला धमकावत होता. या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. माजी नगरसेविका व कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी पुणे महापालिका (PMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. याचबरोबर प्रथमेश यानेही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जयश्री मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 2012 च्या महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या.

Gajanan Marne
मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर 'ईडी'ची कारवाई अन् सोमय्यांनी पुन्हा संधी साधली

वर्षभरानंतर गजा सुटला

गुंड गजा मारणे याची नागपुरच्या कारागृहातून नुकतीच सुटका झाली आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेने मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर रॅली काढल्याप्रकरणी त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. विघातक कृत्यास आळा घालणे या कायद्यांतर्गत गजा मारणेला एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आलं होतं. वर्षभरानंतर गजा मारणेची तुरुंगातून सुटका झाली आहे.

Gajanan Marne
राजकारण तापलं! मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यालाच 'ईडी'चा दणका

पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या गजा उर्फ गजानन मारणे याची पुण्यात चांगलीच दहशत आहे. त्याच्याविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दाखल झाले आहेत. 2014 मध्ये केलेल्या दोन हत्या प्रकरणात गजा मारणे गेल्या सात वर्षांपासून तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. गेल्या वर्षी या हत्यांच्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी तळोजा जेल ते पुणे अशी 300 गाड्यांसह त्याची मिरवणूक काढली. इतकेच नव्हे तर उर्से टोल नाक्यावर फटाके फोडत गोंंधळ घालत या प्रकाराचे ड्रोन शूटही केले. याच मिरवणुकीमुळे गजा मारणेला पुन्हा तुरुंगवारी करावी लागली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com