स्मृती इराणींच्या विरोधात आंदोलन महागात! रुपाली पाटलांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

स्मृती इराणींचा पुणे दौरा ठरला वादाला निमंत्रण
Smriti Irani and Rupali Patil
Smriti Irani and Rupali Patil Sarkarnama

पुणे : भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुणे दौऱ्यात काल (ता.१६) जोरदार राडा झाला. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. याचबरोबर इंधन दरवाढ आणि महागाईवरून इराणींच्या विरोधात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं होतं. हे आंदोलन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यासह 30 ते 40 कार्यकर्त्यांना महागात पडलं आहे. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काल जे डब्लू मेरिएट हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. हे आंदोलन करणं राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना महागात पडलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रुपाली पाटील यांच्यासह महेश हांडे, निलेश निकम, उदय महाले आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Smriti Irani and Rupali Patil
भाजप पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या! आता रुपाली चाकणकर अॅक्शन मोडवर

इराणी यांचं काल सकाळीच पुण्यात आगमन झालं होतं. महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच इराणींचा निषेध सुरू केला होता. महागाईच्या मुद्द्यावर इराणींनी बोलावं अशी मागणी करत सकाळी हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएट इथं माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. तसेच, बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तिरडी आंदोलन करत महागाईचा व केंद्र सरकारचा निषेध केला.

Smriti Irani and Rupali Patil
वैशाली नागवडेंना झालेल्या मारहाणीवर वळसे पाटील म्हणाले, चूक कुणाची...

दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिरात काल भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात हा राडा झाला. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या होत्या. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायल्या उठल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या एका कार्यकर्त्यांनं मारहाण केली. यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com