वसंत मोरेंसह साईनाथ बाबर अडचणीत! पोलिसांकडून गुन्हा दाखल

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Vasant More, Raj Thackeray and Sainath Babar
Vasant More, Raj Thackeray and Sainath Babar Sarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) आणि नेते वसंत मोरे (Vasant More) हे दोघे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेत केलेलं आंदोलन या दोघांना भोवलं आहे.

मनसेच्या वतीने १७ मार्चला पाण्याच्या प्रश्नावरून पुणे महापालिकेत आंदोलन करण्यात आलं होतं. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे परवानगी नसताना महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर गेले होते. त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर काही मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा १०० ते १२५ जणांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत सुरक्षारक्षकांना ढकलून दिले. नंतर त्यांना महापालिकेच्या आवारात आत प्रवेश केला होता. त्यामुळे प्रवेशद्वाराची कडीही तुटली होती.

Vasant More, Raj Thackeray and Sainath Babar
जिथून पळाले तिथंच पुन्हा अवतरले संदीप देशपांडे; ठाकरे सरकारला दिलं थेट आव्हान

महापालिकेच्या आवारात कोणतंही आंदोलन करण्यास मनाई असताना त्यांनी आंदोलन केलं होतं. या प्रकरणी महापालिकेच्या सुरक्षारक्षकाने लेखी तक्रार केली होती. त्यानुसार वसंत मोरे, साईनाथ बाबर यांच्यासह १०० ते १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सात कलमाअंतर्गत हे गुन्हे दाखल केले आहेत. मोरे आणि साईनाथ बाबर यांना या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांना हजर राहण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. येत्या पाच जूनला हा अयोध्या दौरा होता. काही कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत टि्वट करून माहिती दिली आहे.

Vasant More, Raj Thackeray and Sainath Babar
पंजाबमधील काँग्रेसचा बडा नेता फोडल्यानंतर आता भाजपचं गुजरात अन् राजस्थानवर लक्ष

अयोध्या दौरा स्थगित झाला असला तरी पुण्यातील सभा होणार असून, मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी केलं आहे. त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com