भाजप नेते अडचणीत! वैशाली नागवडेंना मारहाण करणं पडलं महागात

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात भाजप अन् राष्ट्रवादीत राडा
Vaishali Nagwade
Vaishali NagwadeSarkarnama

पुणे : भाजप (BJP) नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल (ता.16) जोरदार राडा झाला. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडीओच्या आधारे डेक्कन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

वैशाली नागवडेंसह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या काही पुरूष नेत्यांकडून मारहाण झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचा आधारे डेक्कन पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांवर कलम 323 (मारहाण करणे), 354 (विनयभंग), 504, 506 आणि 34 नुसार कारवाई केली आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईबद्दल वैशाली नागवडे म्हणाल्या की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं आहे. या आरोपींना वेळीच अटक व्हायला हवी. पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

Vaishali Nagwade
युक्रेनचं मोठं यश! रशियाच्या सैन्याला सीमेपर्यंत मागं पिटाळलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमात काल हा राडा झाला. या कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या होत्या. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायला उठल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

Vaishali Nagwade
काशीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलं शिवलिंग; जागा तातडीनं सील

या घटनेनंतर बोलताना नागवडे म्हणाल्या होत्या की, मेरिएट हॉटेलला आम्हाला स्मृती इराणींना भेटू दिलं नव्हतं. त्यामुळं आम्ही बालगंधर्व रंगमंदिरात शेवटच्या रांगेत जाऊन बसलो. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर आम्हीही राष्ट्रवादीच्या घोषणा दिल्या. यानंतर भाजपमधील पुरुष कार्यकर्ते आले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. पोलिसांनाहीभाजपच्या कार्यकर्त्यांनी जुमानलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com