मुख्यमंत्र्यांना दारुच्या बाटल्यांचा हार अर्पण करण्यापूर्वीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार अर्पण करण्याचे आंदोलन करण्याच्या विचारात असलेल्या भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना दुपारीच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरुन ताब्यात घेतले.
मुख्यमंत्र्यांना दारुच्या बाटल्यांचा हार अर्पण करण्यापूर्वीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात
Trupti Desai Bhumata Brigade

सहकारनगर : मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार अर्पण करण्याचे आंदोलन करण्याच्या विचारात असलेल्या भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना दुपारीच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरुन ताब्यात घेतले. 

'महाजनादेश'यात्रेच्या निमित्ताने पुणे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा सुरू असल्याने पुण्यात सायंकाळी सोलापूर महामार्गाने हडपसर मार्गे  शहरात स्वारगेट येथे प्रवेश केल्यावर भुमाता ब्रिगेडच्यावतीने मुख्यमंत्री यांना दारूच्या बाटल्या दाखवून दारूच्या बाटल्यांचा हार अर्पण करून निषेध करण्यात येणार होता, अशी माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली होती.

राज्यात वाढत असलेला दारू व्यवसायमुळे महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत आणि तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. यामुळे सरकारने तत्काळ दारू बंदी करावी यामागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्यावतीने मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्या दाखवून निषेध करण्यात येणार होता. परंतु, तत्पूर्वीच सहकारनगर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई म्हणून तृप्ती देसाई यांना  ताब्यात घेण्यात घेतले आहे, असे सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बडवई यांनी सांगितले

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in