amol-kolhe-ff
amol-kolhe-ff

हॅलो, खासदार अमोल कोल्हेंकडून बोलतोय निधी द्या...

बांधकाम व्यावसायिकाला गंडा घालण्याचा प्रयत्न...

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने देणगी मागून व्यावसायिकांना फसविणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला फसविण्याचा प्रयत्न या आरोपीने केला होता. अशाच एका गुन्ह्यात अटक होऊनही त्याने त्याचा हा धंदा कायम ठेवला होता.

विशाल अरुण शेंडगे (वय ३२, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सुरेश बंडु कांबळे (रा. गंज पेठ) याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्यविरोधात यापूर्वी सात गुन्हे दाखल आहेत. त्यात तो जामीनावर सुटला होता.

याबाबत गेरा बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहितकुमार गेरा (रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात गेरा बिल्डर्स यांन शेंडगे याने फोन केला. खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याचे सांगून नागरिकांना काही तरी मदत करा, निधी द्या, असे सांगून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला.

फोन केलेल्या व्यक्तीबाबत शंका आल्याने गेरा यांनी चौकशी केली असता त्यांना खासदार कोल्हे यांनी फोन केला नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिस आयुक्त व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.
तक्रार अर्जाची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी केली जात होती. त्यावेळी कोल्हे यांच्या नावाने फोन करणारी व्यक्ती शेंडगे असल्याचे समोर आले.

त्यानुसार अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी विनोद साळुंखे आणि अमोल पिलाने यांच्या पथकाने शेंडगे याला पकडले. शेंडगे याला त्याचा साथीदार कांबळे हा फोन करण्यासाठी सीमकार्ड पुरवत असल्याचे तपासातून समोर आले आहे. शेंडगे हा चोरीचा फोन व सीमकार्डचा वापर करून त्याच्यावरून नागरिकांना आमदार व खासदार यांच्या नावाने फोन करत असल्याचे समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com