पुण्यात PMPML ठेकेदारांचा अचानक संप; प्रवाशांचे प्रचंड हाल

Pune PMPML : ठेकेदारांनी संप मागे न घेतल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई होणार!
पुण्यात PMPML ठेकेदारांचा अचानक संप; प्रवाशांचे प्रचंड हाल
Pune PMPML newsSarkarnama

पुणे : PMPML च्या खाजगी ठेकेदारांनी आज सकाळपासून अचानक संपाच हत्यार उपसलं असून सुमारे सहाशे बसची चाक थांबली आहेत. (Pune PMPML Strike) त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या, शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु आहेत. मागील थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचे या कंत्राटदारांनी सांगितले आहे. मात्र हा दबावतंत्राचा भाग असल्याचे PMPML ने स्पष्ट केले असून ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस पाठवली असल्याचे सांगण्यात आले आहे.(Pune PMPML news)

PMPML मध्ये सुमारे ७ खाजगी ठेकेदारांच्या ९५६ गाड्या भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे ६५० ते ७०० बस दररोज प्रत्यक्ष मार्गांवर धावतात. मात्र याच बसेसची वाहतूक शुक्रवार सकाळपासून अचानक बंद झाली आहे. याबाबत एका खाजगी ठेकेदाराकडे विचारणा केली असता गेल्या मागील ८ महिन्यांपासून १०७ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळाली नसल्याबद्दल हा संप केला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मेस्मा अंतर्गत नोटीस बजावताच ठेकेदारांपैकी बीव्हीजी ग्रूपने या संपातून माघार घेतली असून त्यांच्या १०० बस मार्गांवर आल्या आहेत.

याबाबत बोलताना PMPML च्या सह व्यवस्थापिकीय संचालक डॉ. चेतन केरुरे म्हणाले, ठेकेदारांना गुरुवारीच ५४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे पैसे आज त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्यामुळे संप करण्याचे वेगळेच कारण आहे. ठेकेदारांकडून बस कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा निधी दिला जात नाही, अशा कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी वेळेत भरण्याचा त्यांना आदेश देण्यात आला आहे. तसेच याबाबत प्रशासनाने पडताळणी ही सुरू केली आहे. याच गोष्टीच्या रागातून हा संप झाला असावा, असे वाटते. परंतु प्रशासनाने PMPML च्या १२०० पैकी जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.