पुणे : पुण्यात नेट- सेट आणि पीएचडी धारक प्राध्यापकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पुण्यातल्या शिक्षक संचालक प्रशासकीय इमारतीपासून ते सावित्रिबाई पुणे विद्यापीठापर्यंत (Pune University) प्राध्यापकांनी आता मोर्चा काढला आहे. ऐन दिवाळीसणात प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यासांठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. तुमची दिवाळी, आमचं मात्र दिवाळं, असे म्हणत नेट- सेट आणि पीएचडी धारक संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यभरातील सुमारे ५० हजार प्राध्यापक नेट- सेट आणि पीएचडी धारक आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यभरात १६ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. मागील सरकारच्या काळात पावणे चार हजार प्राध्यापकांची पदभरती सुरू केली. त्यामधीलच २०८८ पदे अजूनही रिक्त आहेत, असे प्राध्यापक मोर्चाचे प्रतिनिधिंकडून सांगण्यात आले.
आम्ही आता वेगवेगळ्या महाविद्यालयात विनाअनुदानित तत्वावर काम करत आहोत. विनाअनुदानित तत्वावर काम करताना आम्हाला अतिशय तुटपुंज्य वेतनावर काम करावं लागतं. यातही काम करत असताना तास आणि तासिकेचा गोंधळाला सामोरे जावं लागतं. ज्या पद्धतीने पूर्णवेळ काम करताना वेतन मिळणे अपेक्षित आहे, तसे वेतन आम्हाला मिळत नाही, असे काही प्राध्यापकांनी आपली व्यथा मांडली.
१०० % प्राध्यापक भरती ही प्रमुख मागणी नेट- सेट आणि पीएचडी धारक संघर्ष समितीचं आहे. नेट सेट धारक झालो तरी बहुतांश जणांना नोकरीच उपलब्ध नाही. शासन दरबारी जाऊन आम्ही नेट सेट भवनाला आम्ही टाळे ठोकणार आहोत, अशी आक्रमक भूमिका यावेळी प्राध्यापकांनी घेतली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.