आजपासून रात्रीची संचारबंदी: अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार - pune night curfue from today | Politics Marathi News - Sarkarnama

आजपासून रात्रीची संचारबंदी: अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार

umesh ghongade
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

आजपासून रात्रीची संचारबंदी: अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार
पांडुरंग सरोदे : सरकारनामा ब्यूरो

पुणे : जीवनावश्‍यक वस्तुंचा पुरवठा आणि अत्यावश्‍यक सेवा करणाऱ्यांशिवाय रात्री अकरानंतर घराबाहेर रस्त्यावर येणाऱ्या नागरीकांवर पोलिसांची नजर राहणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांवर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई होईल, असे पुणे पोलिसांनी मंगळवारी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या रात्रीच्या संचारबंदीचा आदेश मंगळवारपासून लागू झाला. त्यानुसार पुणे पोलिसांनी आज दुपारी आदेश काढले आहेत. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात सरकारने अत्यावश्‍यक कामांसाठी दिलेल्या सेवा व सवलती संचारबंदीच्या कालावधीमध्ये लागू असतील, असे पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या विषाणूचा नवा प्रकार सापडल्याने सर्वत्र सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून राज्यातील महापालिकांच्या हद्दीतील रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. त्याआधी संचारबंदीच्या काळात पुणेकरात कोणत्या मर्यादा असतील आणि काय सवलती असतील, याबाबतचा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी मंगळवारी काढला. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीच्या सुचनाही दिल्या.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्य सरकारने मंगळवारी रात्रीपासून (ता.22) ते 5 जानेवारीपर्यंत महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.राज्य सरकाराने दिलेल्या आदेशानुसार संचारबंदी लागू असेल. यापुर्वी लॉकडाऊनच्या काळात सरकारने अत्यावश्‍यक कामांसाठी दिलेल्या सेवा व सवलती संचारबंदीच्या कालावधीमध्ये लागू असतील, असे पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

या सेवा/सवलती राहणार सुरु
अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार
भाजीपाला, फळे, जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने राहणार सुरू
वैद्यकीय व अतिमहत्वाच्या कामांसाठीच बाहेर पडण्याची परवानगी

अशा असतील मर्यादा
रात्रीच्यावेळी विविध प्रकारच्या कंपन्या, आस्थापना बंद
उद्योग, व्यावसाय व कंपन्यांना रात्रीच्या शिफ्ट लवकर संपविण्याच्या सुचना
नागरीकांनी व विविध क्षेत्रातील कामगारांनी रात्री साडे दहा पर्यंत घरी पोचणे बंधनकार
अत्यावश्‍यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांनाही परवानगी नाही

नागरीकांनो ही घ्या काळजी
शहरात विनाकारण फिरण्यास मनाई
अत्यावश्‍यक काम असेल तरच रात्री घराबाहेर पडावे
नागरीकांनी मध्यरात्री प्रवास करणे टाळा
प्रवासादरम्यानची तिकीटे, वैद्यकीय कागदपत्रे किंवा आवश्‍यक कागदपत्रे जवळ ठेवावीत
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख