Pune News : शिवतारे,आढळरावांना शिंदे गटाकडून मिळाले पहिले गिफ्ट;जिल्हा नियोजन समितीवर वर्णी

Shinde Fadnavis Government : माजी आमदार,अगदी माजी मंत्र्यांनाही नियोजन समितीवर येण्याचा मोह टाळता आला नाही.
shivajirao Aadhalrao Patil, Vijay shivtare
shivajirao Aadhalrao Patil, Vijay shivtare Sarkarnama

Pune Politics News : राज्य सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित मिळून एकूण २० सदस्यांच्या नियुक्त्या मंगळवारी जाहीर केल्या. २० जणांमध्ये विधानसभा, विधानपरिषद तसेच संसद सदस्यांमधून निवडण्यात येणाऱ्या दोन, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या चार अशा एकूण सहा नामनिर्देशित तर, अन्य १४ विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेळ आहे. या १४ सदस्यांमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या सहाजणांना संधी मिळाली आहे.

नामनिर्देशित सदस्यांमध्ये आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर आदी सदस्यांचा समावेश आहे.

shivajirao Aadhalrao Patil, Vijay shivtare
Gulab Nabi Azad : आझादांचं बंड तीन महिन्यांतच थंड; 30 संस्थापक सदस्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

याशिवाय भगवान नारायण पोखरकर, माजी मंत्री बाळा भेगडे, वासुदेव काळे, आशा बुचके, राहुल बाबूराव पाचर्णे,जीवन कोंडे, पांडुरंग कचरे, विजय फुगे,काळुराम नढे, प्रवीण काळभोर, योगेश टिळेकर, शरद हुलावळे, अलंकार कांचन आणि अमोल पांगारे यांचा समावेश आहे.

शिंदे गटाकडून विजय शिवतारे, शिवाजीराव आढळराव (Shivajirao Aadhalrao Patil) यांच्याशिवाय भगवान पोखरकर, अलंकार कांचन, अमोल पांगारे व शरद हुलावळे यांन संधी मिळाली आहे.पुणे जिल्हा नियोजन समितीवर महाविकास आघाडी सरकारने नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार कोसल्याने त्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मागील सुमारे सहा महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या जागा रिक्त होत्या.

shivajirao Aadhalrao Patil, Vijay shivtare
Vinod Tawde Chandigarh News : तावडेंनी पुन्हा करुन दाखवलं; भाजपने मारली बाजी; काँग्रेसची भूमिका ठरली महत्त्वाची

सदस्यांमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून माजी मंत्री शिवतारे व माजी खासदार आढळराव वगळता इतर कार्यकर्त्यांना संधी देण्याचे आल्याचे दिसते. मात्र, भारतीय जनता पार्टीकडून कार्यकर्ते बाजूला ठेऊन नेहमीच्या पदाधिकाऱ्यांनाच संधी साधल्याचे दिसत आहे. माजी आमदार,अगदी माजी मंत्र्यांनाही नियोजन समितीवर येण्याचा मोह टाळता आला नाही. पक्षाच्या महत्वाच्या इतर कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी काहीजणांनी आपली वर्णी या समितीवर लावून घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे पक्षासाठी वर्षानुवर्षे राबणारे कार्यकर्ते लांबच राहिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com