Pune News : पुणे महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग होणार!

Pune News : नव्याने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याच्या कामकाजाला सुरूवात करण्यात येत आहे.
Pune News :
Pune News :Sarkarnama

पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभागरचनेवरून मागील महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत होते. महाविकास आघाडीचा तीन प्रभागांचा निर्णय आताचे सरकार रद्द करणार, नव्याने चार सदस्यीय प्रभागरचना होणार अशी शक्यता होती. मात्र याबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्यासाठी आदेश दिले होते. या आदेशात नेमकी स्पष्टता दिसून येत नाही. मात्र आता पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून जुन्या निर्णयाप्रमाणे प्रभागरचनेच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ निवडणुकांसाठी सदस्य संख्या कमी करण्यात आली होती.

मागील महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता. या निर्णयात कसलाही बदल किंवा फेरफार कलेला नाही. या निर्णयानुसारच आता कामकाजाला सुरूवात करण्यात येत आहे. नवीन कोणतेही आदेश शासनाकडून किंवा निवडणूक आयोगाकडून अजूनही आलेले नाहीत. यामुळे महापालिकेने जानेवारी 2022च्या आदेशानुसारच प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

Pune News :
कात्रजचे दूध तपासणी करणारे पाच केमिस्ट निलंबित..अन्य चार जणांची तत्काळ उचलबांगडी

मार्च 2022 ला न्यायालयानच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाला मंजूरी मिळीली नव्हती. यामुळे निवडणूक पुढे जावी, यासाठी मविआ सरकारने तीन सदस्य प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. सत्तांतर घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने 2017 च्या धर्तीवर निवडणूक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, असा स्पष्ट आदेशाचा निर्णय महापालिकेस अजूनपर्यंत मिळालेला नाही. यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. महापालिका प्रशासन आता तीन सदस्यीय रचनेनुसारच पण नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. याबाबत आता पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Pune News :
धोका वाढला!`स्वाइन फ्लू`नंतर आता गोवरसाठीही क्वॅारंटाईन सेंटर सुरु होण्याची शक्यता

दोन महिन्यांचा कालावधी :

प्रभाग रचनेचं प्रकरण न्यायालयात आहे. असे असले तरीही सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार राज्य शासनास असल्याने न्यायालयाकडून काहीही निर्णय दिला तरी, महापालिकेस नव्याने प्रभाग रचना करावीच लागणार असल्याचे स्पष्ट आहे. या सर्व कामकाजासाठी किमान दोन महिन्यांचा वेळ लागणार आहे.

नव्याने प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविणे, आरक्षण व्यवस्था करणे, मतदार याद्या अद्ययावत करणे अशा कामांसाठी दोन महिन्याचा काळ लागणार आहे. यात निवडणुकांच्या कार्यक्रमासाठीही वेळ लागणार आहे. यामुळे आता निवडणुका पढे ढकलल्या आहेत. निवडणूक मार्च महिन्याची सुरूवातीला किंवा एप्रिल महिन्याच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com