Pune News : 'भीमा कोरेगाव' लढ्यावर पुस्तक लिहणारे रोहन जमादार यांना मुंडकं उडवण्याची धमकी!

Pune News : काही आंबेडकरी अनुयायी यांचा रोहन यांच्या पुस्तकातील मांडणीला आक्षेप..
Pune News
Pune Newssarkarnama

Pune News : एक जानेवारी 1818 च्या भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईवर पुस्तक लिहणारे लेखक अॅड. रोहन जमादार माळवदकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून गोळ्या घालून मुंडके उडवू, अशी धमकी देत, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. याबाबत आता माळवदकर यांनी पुण्यातील सांगवी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

'एक जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव' हे पुस्तक रोहन माळवदकर यांनी लिहले आहे. ऐतिहासिक घटनेवर आधारित हे पुस्तकावर मागील अनेक वर्षे वादात आहे. लेखक माळवदकर हे कोरेगाव भीमा या गावातील रहिवासी आहेत. रोहन हे व्यावसायिक वकील आहेत. त्यांचे हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात आहे. आंबेडकरी विचारांच्या काही लोकांचा या पुस्तकाला विरोध आहे. हे पुस्तक मागे घेण्यात यावे, यावर बंदी घालण्यात यावी, अशीही मागणी ही याआधी होत होती.

Pune News
Venugopal Dhoot : व्हिडीओकॉनचे वेणूगोपाल धूत यांचा अर्ज फेटाळला : हायकोर्टात आव्हान देणार!

पुराव्याच्या आधारेच लेखनाचा दावा :

रोहन यांनी पुस्तकाचे लेखन पुरावे आणि तथ्यांच्या आधारावर केले असल्याचा दावा केला आहे. आपण वेळोवेळी विविध पुरावे सादर केले आहेत, असा ही त्यांचा दावा आहे. मात्र हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Pune News
Amit Shah News : अमित शाह यांनी ते पोस्टर पाहिले अन् राज्यातील सत्तांतराची वात पेटली?

आधीही आले धमक्यांचे फोन :

या आधीही रोहन यांना धमकीचे फोन आले आहेत. सर्व धमक्यांचे कॉल रेकॉर्डिंग करून त्यांनी सोशल मीडियावर त्यांनी याआधीही अपलोड केले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. या बाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in