Pune News : मित्रासाठी कायपण ! सरपंचकी मिळवली अन् मित्रानं थेट दारात गाडीच उभी केली

पुणेकर नेहमीच त्यांच्या हटके गोष्टींमुळे चर्चेत असतात.
Pune  News :
Pune News :

Pune News : पुणेकर नेहमीच त्यांच्या हटके गोष्टींमुळे चर्चेत असतात. पुणेरी पाट्या असो वा पुण्यातील राजकीय बॅनरबाजी, पुणे तिथे काय उणे या म्हणीची प्रचिती कायम पुणेकर घेत असतात. अशातच आता पुन्हा एकदा पुण्यातून एक हटके बातमी समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील केसनंद गावात मित्र सरपंच झाल्यानंतर गावातील इतर मित्रांनी मिळून आपल्या सरपंच मित्रासाठी फॉर्च्युनर (fortuner) गाडी भेट दिली आहे. हे वाचुन तुम्हाला धक्का बसेल पण हे खरं आहे. केसनंद ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन हरगुडे आणि उपसरपंच अक्षदा हरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी पुन्हा निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात दत्तात्रय हरगुडे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली.

Pune  News :
Pune Congress : पुणे काँग्रेसमधला वाद; शहराध्यक्षानाच संघटनेच्या कामाची माहिती नसल्याचा आरोप

दत्तात्रय हरगुडे यांच्या निवडीनंतर त्यांच्या मित्रांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.मित्रांचा हा जल्लोषही साधा नव्हता. आपल्या सरपंच मित्रासाठी त्यांनी थेट फॉर्च्युनर गाडी भेट दिली. “सरपंचपदी निवड झाल्यामुळे मला मित्रांनी फॉर्च्यूनर कार गिफ्ट दिली. मित्रांच्या या प्रेमामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता माझी जबाबदारी वाढली आहे. मी गावाच्या विकासासाठी १०० टक्के प्रयत्न करेन, असं म्हणत दत्तात्रय हरगुडेंनी आपल्या मित्रांचे आभार मानले आहेत.

आमचा आबा हा कधीही स्वतःवर खर्च करत नाही. पण त्याने समाजासाठी, गावासाठी खूप केले. जो स्वतःवर खर्च करण्यासाठी तो तयार नसतो. त्यामुळे आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून त्याच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं. आबा नेहमी साध्या गाडीतून प्रवास करतात. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांच्यांसाठी फॉर्च्यूनर गाडी भेट दिली, अशी भावना त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in