Pune News : पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; हिंदुत्ववादी संघटनांचा लव्ह जिहाद,धर्मांतराविरोधात एल्गार

Pune News : या मोर्चासाठी पुण्यातील वाहतूकीत बदल...
hindu janaakrosh Morcha
hindu janaakrosh Morcha Sarkarnama

Hindu Janakrosh Morcha : पुण्यात हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी (दि.२२) हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी दहा वाजता या मोर्चाला लालमहालापासून सुरुवात झाली असून डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे. या मोर्चात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर भाजपचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही या मोर्चात सहभागी झाले आहेत.

पुण्यातील हिंदू जनआक्रोश मोर्चाला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजाभैय्या, संत श्री तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजीराव मोरे, धनंजय देसाई यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत.

यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासाठी पुण्यातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

hindu janaakrosh Morcha
Yogesh Kadam: '' उद्धव ठाकरेंनी आजवर कोणालाही मोठं होऊ दिलेलं नाही, त्यांच्या पक्षात जाणं म्हणजे...''

रविवारी सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाला सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने हा मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल आणि या ठिकाणी समारोप होणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहे. भगवे ध्वज, घोषणाबाजी, पारंपरिक पोशाखात परिधान केला आहे. या मोर्चात महिलांही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

hindu janaakrosh Morcha
Thackeray-Shinde News : 'साहेब मी गद्दार नाही..' 'त्या' जाहिरातीतून राऊतांनी पुन्हा शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळले

यावेळी तेलंगणाचे आमदार राजाभैय्या काय म्हणाले...

देशातील प्रत्येक हिंदूला आज असं वाटतंय की, धर्मांतर बंद व्हायला हवं. लव्ह जिहाद यावर कायदा यायला हवा. भारतातील अनेक तरुण-तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव जिहाद च्या नावाखाली फसवल जात आहे. या नावाखाली आपण बघितलं की एका मुलीचे ३५ तुकडे करून मारण्यात आलं.भारताच्या अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी आहुती दिली त्यांचा हा दिवस संपूर्ण भारतात बलिदान दिन म्हणून घोषित केला पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर राजकारण करू नका त्यासाठी दुसरे विषय आहेत. मी जनतेला सांगेल की कोणी मंत्री संभाजी महाराज यांच्यावरून राजकारण करत असेल तर त्यांच्यावर बहिष्कार टाका. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा लढले नसते तर आज हिंदू नसते. औरंगजेब समोर झुकले असते तर हिंदू आज सुरक्षित असता का?राज्यातील नेत्यांना मी सांगेल की, या गोष्टीचे घाणेरडे राजकरण करू नका. मी धर्मवीर संभाजी महाराजांचा मी भक्त आहे असेही राजाभैय्या म्हणाले.

वाहतुकीत बदल

मोर्चा लालमहाल येथे जमण्यास सुरुवात झाल्यावर फडके हौद चौकाकडून येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.मशाल यात्रेस जिजामाता चौक येथे गर्दी झाल्यानंतर आवश्यकतेनुसार, शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने इच्छितस्थळी पोहचणार आहेत.

गणेश रोड- दारूवाला पुलाकडून फडके हौद चौक जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक ही दारुवाला पूल आणि फडके हौद चौकातून इच्छितस्थळी जातील.बाजीराव रोड पूरम चौकातून बाजीराव रोडने महापालिकेकडे येणारी वाहतूक ही सरळ टिळक रोडने अलका चौक आणि खंडोजीबाबा चौकातून जातील. केळकर रोडने अप्पा बळवंत चौकाकडून जोगेश्वरी मंदिर चौकमार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in