
Banda Tatya Karadkar : ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांच्यावर पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी एक अनोखा संकल्प केला. त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ यांच्या चरणाशी त्यांनी सुमारे पाच लाख रूपयांचे किमतीचे आठ तोळे सोने अर्पण केले आहे. तात्या यांचे भक्त सुनिल राऊत यांच्याकरवी पंढरपूरच्या बापूसाहेब महाराज देहूकर यांच्याकडे हे सोने सोन्याच्या दागिन्याची भेट मकरसंक्रांतीच्या मूहुर्तावर निव़त्तीनाथांच्या चरणी अर्पण करण्यात आले.
बापूसाहेब महाराज देहूकर यांनी हे सोन्याचे दागिने आता निवृत्तीनाथ महाराज संस्थांनच्या हवाली करण्यासाठीत्र्यंबकेश्वरकडे देवस्थानाकडे प्रस्थान केले आहे. बंडातात्या कराडकर हे मागील अनेक वर्षांपासून कीर्तन, प्रवचन भजन करत आले आहेत.
बंडातात्या कराडकर हे मागील अनेक वर्षे गावागावात जात कीर्तन, प्रवचन करण्याचं काम केलं. या कामातून त्यांना मिळालेले मानधनातून त्यांनी नेहमी समाजासाठी दान केले. अनेक दुर्लक्षित मंदिरे, देवस्थानला त्यांनी आर्थिक मदत केली आहे. नुकतंच त्यांनी सोने दानाचा संकल्प केला होता. त्र्यंबकेश्वर मधील निवृत्तीनाथ महाराज मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला सोने अर्पण करणार असा त्यांचा संकल्प होता. नातेपुते येथील त्यांचे भक्त सुनिल राऊत यांच्याशी याबाबतीत चर्चा करत, त्यांनी आठ तोळे सोन्याचे दागिने तयार करण्यास सांगितले. याप्रमाणे त्यांनी सोन्याचे दागिने तयार करुन घेतले.
दरम्यान, ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या भेटीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भेट घेत, प्रकृतीची माहिती घेतली. बंडातात्या कराडकर यांना गुरुवारी (ता. १२) रोजी पक्षाघाताचा त्रास झाला होता. त्यांच्यावर प्राथमिक उपचार फलटण येथील खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते.
शुक्रवार (ता. १३) रोजी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णाल्यामध्ये हलविण्यात आले. रुग्णालयाच्या बाहेर बंडातात्यांचे अनुयायी आणि राज्यातील जेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, रुग्णालयाचे कडक नियम पाळून कुणीही आत प्रवेश करत नाही. प्रत्येक जण आपआपल्या परीने परमेश्वराकडे आपल्या परमभक्तास पांडुरंगाने लवकर बरे करावे. अशी प्रार्थना करीत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.