Pune News : तब्बल 22 वर्षानंतर हवेली बाजार समितीत निवडणुका; भाजप पहिल्यांदाच मैदानात!

Pune News : "भाजप या बाजार समितीची सत्ता ताब्यात घेईल."
Pune News :
Pune News : sarkarnama

Pune News : न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल २२ वर्षांच्या दीर्घ खंडानंतर आता पुणे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशी समजली जाणारी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक पार पडणार आहे. या बाजार समितीवर नेहमीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता राहिलेली आहे. या महत्त्वाच्या बाजार समितीच्या यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आता आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून, प्रचंड ताकदीनीशी उतारणार आहे.

या निवडणुकीसाठी भाजपकडून स्वतंत्र पॅनेलची उभारणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पुढील आठवड्याभरात जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मंगळवारी (ता.१७) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महत्त्वाची समजील जाणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवरही (पीडीसीसी) आतापर्य्त भाजपचा एकही संचालक कार्यरत नाही. परंतु मागच्या वर्षी झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिग्गज संचालकांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पराभूत झालेले हेच दोन दिग्गज आणि भाजपचे हेच विजयी झालेले संचालक हे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीशी निगडित असतील.

Pune News :
Pune Crime News : कितीही कारवाया करा; पुण्यात कोयत्याची दहशत कायम!

यामुळे आता जिल्हा बॅंकेत्या निवडणुकींप्रमाणेच बाजार समितीच्या निवडणुकीतहीभाजपकडून स्वतंत्रपणे पॅनेलची उभारणी करण्यात येणार आहे. यावेळी भाजप या बाजार समितीची सत्ता ताब्यात घेईल, ,असा विश्‍वास कामठे यांनी व्यक्त आहे.

कामठे पुढे म्हणाले, ‘‘या कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या बावीस वर्षांपासून प्रशासकराज आहे. मात्र उच्च न्यायालयाने या बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक घेण्याचा नुकताच आदेश दिला आहे. या आदेशानुसार या बाजार समितीची निवडणूक घेण्यात येत आहे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com