Pune News :
Pune News : Sarkarnama

Pune News : पुणे तिथे काहीही शक्य.. ; चक्कं तलाव पात्रात क्रिकेट खेळत 'मनसे' आंदोलन..

Mns Pune News : "पाच वर्ष इथे भाजपचे नगरसेवक आहेत, पण.."

MNs Protest In Pune : पुण्यात मनसेच्या (MNS) वतीने औंध परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. औंध भागातील जलतरण तलाव पाच वर्षांपासून बंद आहे. या विरोधात आता मनसेने अनोखे आंदोलन सुरू केले आहे . मुलांना पोहण्यासाठी या ठिकाणी जलतरण तलाव नाहीये. यासाठी आता मनसेने आंदोलन केले आहे. (Pune News)

जलतरण तलावाच्या पात्रात क्रिकेट खेळत मनसेने महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. मुलांना इते जलतरण करण्याची सुविधा मिळत नाही, या जलतरण तलावाचे तीन तेरा वाजले आहेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने जलतरण पात्रात क्रिकेट खेळून हा मुद्दा चर्चेत आणाला.

Pune News :
Satara News : शिवेंद्रराजेंना पाडूनच रिटायर्डमेंट घेणार : दीपक पवारांचा निश्चय

मनसेचे पुण्यातील नेते रणजित शिरोळे यांनी म्हंटले की, "पाच सहा वर्षांपासून इथले जलतरण तलाव बंद आहे. मागील एक-सव्वा वर्षापासून प्रशासक असले तरी, पाच वर्ष इथे भाजपचे नगरसेवक आहेत. महापालिकेत त्यांची सत्ता आहे. केंद्रात भाजपचीच सत्ता आहे. तुमच्याकडे पूर्ण सत्ता असूनही, नागरीकांच्या कराचे पैसे घेऊन ही तुम्ही सुविधा पुरवू शकत, नसाल तर तुम्ही सत्तेत बसण्याच्या लायकीचे नाहीत."

Pune News :
Karnataka CM Decision : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस मुख्य प्रवक्ते सुरजेवालांचं मोठं विधान!

"मनपाच्या अधिकारीही याची दखल घेत नाहीत, याबाबत त्यांना विचारले असता अधिकारीही सारवासारव करतात. प्रत्येकजण आपली जबाबदारी झटकत आहेत. तुम्हाला कामाची जबाबदारी तर पायऊतार व्हा, आम्ही सक्षम आहोत. मनपामध्ये मनसे सत्तेत आली,अशी दुरावस्था कुठेही दिसणार नाही," असे रणजित शिरोळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com