'पुणे-नाशिक रेल्वे'च्या तरतूदीचे वृत्त दिशाभूल करणारे : अमोल कोल्हे

हे वृत्त जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणारे असून त्यामध्ये काहीही तथ्य नाही" असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
Amol Kolhe
Amol Kolhesarkarnama

मंचर : ''पुणे-नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वेसाठी (Pune-Nashik High Speed ​​Railway) केंद्रीय अर्थसंकल्पात नेमकी किती तरतूद झाली, हे स्पष्ट झाले नसतानाही याबाबत निधीची तरतूद करण्यात आल्याच्या समाज माध्यमांवरील वृत्ताबाबत शिरुर लोकसभेचे खासदार डॅा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

''केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १ हजार कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. हे वृत्त जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणारे असून त्यामध्ये काहीही तथ्य नाही" असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Amol Kolhe
इमारतीचा स्लॅब कोसळून पुण्यात सहा मजुरांचा मृत्यू

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हे शिरूर लोकसभा मतदार संघातील जनतेने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांत केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे राज्य सरकारने मंजुरी दिली असली तरी केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यासाठी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्याची मागणीही केली होती.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, तळेगाव ते नाशिक एकेरी रेल्वेमार्गासाठी निधी मंजूर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय निधी दिला जाऊ नये अशी तळटीपही टाकण्यात आली आहे. मात्र पूर्ण माहिती न घेता काही जण जनतेची दिशाभूल करुन संभ्रम निर्माण करीत आहेत,.

Amol Kolhe
ठाकरे सरकारचा माज उतरवणार ; मुनगंटीवारांचा हल्लाबोल

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी मिळावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असून रेल्वेसाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीतून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी निधी मिळावा, यासाठी माझे प्रयत्न असून त्यासाठी नाशिक, शिर्डी व पुण्याचे खासदार आम्ही सर्वजण आग्रही असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. हा महत्वाकांक्षी प्रकल्प तडीस नेईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. जनतेने पाहिलेले हे स्वप्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्याने नक्की पूर्ण करणार अशा शब्दांत खासदार डॉ. कोल्हे यांनी आश्वस्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com