पुणे पालिका निवडणूक : आघाडी चर्चेत पुढे;भाजपा-मनसेचे कधी ठरणार ?

कोणत्याही परिस्थितीत पुण्यात भाजपाकडून सत्ता खेचून घ्यायचीच यावर महाविकास आघाडीच्या तीन्ही घटक पक्षात एकमत झाले आहे.
पुणे पालिका निवडणूक : आघाडी चर्चेत पुढे;भाजपा-मनसेचे कधी ठरणार ?
MVASarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने निवडणुकीतील आघाडीच्या दृष्टीने चर्चेच्या दोन फेऱ्या सकारात्मकपणे पूर्ण केल्या. निवडणूक एकत्र लढण्याचा ठाम निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीबाबत अद्याप ठोसपणे कोणतीच चर्चा दिसत नाही.परिणामी महाविकास आघाडी एक पाऊल पुढे टाकून आघाडी घेतली आहे.

कोणत्याही परिस्थितीत पुण्यात भाजपाकडून सत्ता खेचून घ्यायचीच यावर महाविकास आघाडीच्या तीन्ही घटक पक्षात एकमत झाले आहे.या पुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष जागा वाटपावर चर्चा केली जाणार आहे.भाजपाव मनसेत मात्र, अद्याप युती होणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. मध्यंतरी मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी युतीबाबत सकारात्मक विधान केले होते. मात्र, त्यावर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी तूर्त चर्चा नको, अशी भूमिका घेतल्याने सध्या शांतता आहे. भारतीय जनता पार्टीकडून शहर पातळीवर कोणतीच प्रतिक्रीया येत नाही. राज्य पातळीवरदेखील कुणी बोलत नाही. त्यामुळे युती होणार की नाही याबाबत दोन्ही बाजूने ठामपणे काहीच बोलले जात नाही.

MVA
पुण्यात साकारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय

महाविकास आघाडीत एकत्र येण्याबाबत ठामपणे सांगितले जात आहे. मात्र, पुण्यात महापौर शिवसेनेचाच होईल, अशी घोषणा करून आणखी वेगळे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात येऊन गेल्या पंधरा दिवसात शिवसेनेचा महापौर होणार असल्याचे भाकीत केले आहे.

MVA
दीड वर्षानंतर : पुण्यात २२ ऑक्टोबरपासून उघडणार नाट्य-चित्रपटगृहांचा पडदा

साऱ्या गोष्टी चर्चेच्या पातळीवर असल्या तरी महाविकास आघाडी एकत्र आली तर भाजपाला सत्तेत येणे अवघड होऊ शकते. दुसरीकडे आघाडीतील तीन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांना त्यांच्यात होणारी बंडखोरी कशी रोखणार हा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे आघाडी झाली तरी त्यांच्यात होणाऱ्या बंडखोरीचा फायदा भाजपाला होणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.