पाणीपुरवठ्याबाबत पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय ; उद्यापासून अमंलबजावणी

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सहा जुलैपासून सक्रिय झाला आहे.
khadakwasla
khadakwaslasarkarnama

पुणे : गेल्या दोन दिवसापासून पुण्याच्या (pune) धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे खडकवासला (khadakwasla)प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस शहाराला नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. (pune water supply news)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा कमी झाल्याने पुणे महापालिकेने दिनांक ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते. ११ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमितपणे करण्याचा निर्णय घेतला होता.

आता येत्या २६ जुलैपर्यंत शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाणीकपात रद्द होणार असल्याचे महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. २६ जुलै रोजी धररणातील पाणीसाठ्याचा विचार करून पाणी वितरण आणि वाटपाचा निर्णय घेतला जाईल, असं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितलं आहे.

khadakwasla
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा दणका ; 3000 कोटींच्या सिंचनाची कामे लटकणार

पानशेत, वरसगांव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. यंदा चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने धरणातील पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे चार जुलैपासून ११ जुलैपर्यंत पाणीकपात करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला होता.

  1. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सहा जुलैपासून सक्रिय झाला.

  2. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात दमदार पाऊस सुरु आहे.

  3. खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा २७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

  4. शनिवारी (९ जुलै) रात्रीपर्यंत धरणामध्ये एकूण ६.९५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा होता.

  5. रविवारी सकाळ पर्यंत पाणीसाठ्यात ०.७९ टीएमसीने वाढ होऊन पाणीसाठा ७.७४ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

  6. पुढील काही दिवस शहर आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

  7. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पावसाची शक्यता असून त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com