आम्हीच पुन्हा सत्तेत येणार ; पुण्यात विरोधकांच्या नुसत्या वावड्या

'पुणेकर भाजपलाच (bjp) पसंती देतील,' असे गणेश बीडकर (Ganesh Beedkar) म्हणाले. 'सरकारनामा'च्या विशेष मुलाखतीत बीडकर बोलत होते.
Ganesh Beedkar
Ganesh Beedkarsarkarnama

पुणे : ''पुणेकरांची सेवा भाजपनं केली आहे. आमचे शंभर नगरसेवक आहेत, आम्ही पुन्हा सत्तेत येणार,'' असा विश्वास पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) सभागृहनेते गणेश बीडकर (Ganesh Beedkar) यांनी व्यक्त केला. पुणेकर भाजपलाच (bjp) पसंती देतील, असे बीडकर म्हणाले. 'सरकारनामा'च्या विशेष मुलाखतीत बीडकर बोलत होते.

नुकत्याच झालेल्या पीएमआरडीएच्या निवडणुकीबाबत बीडकर म्हणाले, ''भाजपमधील मते फोडू अशा वल्गना महाविकास आघाडीने खूप केली. पण आमचे एकही मत ते फोडू शकले नाही. आमची १७० मते होती. एकही मत फुटू शकलं नाही. कॉग्रेसमधील १० अन् राष्ट्रवादीचे ४१ यातील किती मते फुटली हे सगळ्यांना माहित आहे. भाजपनं तन्मयतेने शहरात काम केलं आहे, पुणेकरांनीही भाजपवर अतोनात प्रेम केलं आहे. यातून उतराई होण्याचे काम आम्ही करतो आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ,''

''पुण्यात भाजपची क्षमता अन्य पक्षापेक्षा चैापट आहे. आमचे दोन आमदार जरी पराभूत झाले असतील तरी ते काही हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराजय झाला आहे, त्यामुळे त्याला पराजय म्हणता येणार नाही. आत्तापर्यंतच्या पाच निवडणुकामध्ये आमची टक्केवारी तीच राहिली आहे, आमच्या नगरसेवकांनी केलेलं काम, या शहरातील पायाभूत समस्यांवर केललं काम, यामुळे आमचचं सरकार येणार आहे, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही,'' असे बीडकर म्हणाले.

Ganesh Beedkar
CNGचा पुण्यात 'भडका' महिनाभरात दोन वेळा दरवाढ

''पुण्याच्या मुळ प्रश्नांना हात घालण्याचं काम भाजपनं केलं आहे. सार्वजनिक वाहतुकीत पीएमपीएलमध्ये केलेल्या कामामुळे पुणे महापालिका देशातील एक नंबरची महापालिका ठरली आहे. त्यामुळे एकुण जर विचार केला तर भाजपला पसंतीक्रम राहणार आहे. आमच्याकडे १७० उमेदवार लढण्यासाठी आहे, एवढे उमेदवार कुठल्याही पक्षाकडे नाही. राष्ट्रवादी, कॉग्रेस, शिवसेनकडे एवढे उमेदवार नाहीत. त्यामुळे हे तीनही पक्ष एकत्र येण्याची आम्हाला चिंता नाही,'' असे बीडकर म्हणाले.

''पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत सध्या बदल करण्याचे काम सुरु आहे, याबाबत विचारले असता बीडकर म्हणाले, ''प्रभाग रचनेत कितीही बदल केले तरी आमचे विद्यमान १०० नगरसेवक आणि अजून ७० जागा आम्ही लढणार आहोत, अशा दीडशे ठिकाणी आम्ही क्षमतेच्या बाहेर जाऊन लढणार आहोत. त्यांनी कितीही राजकारण केलं तरी काहीही उपयोग नाही. राजकारण हे शॉर्टटर्म असतं. समाजकारण हे लॉगटर्म असतं. त्यामुळे आम्हाला त्यांची चिंता वाटत नाही,'' असे बीडकर यांनी स्पष्ट केलं.

शहर भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याची चर्चा आहे. या प्रश्नाला उत्तर देताना बीडकर म्हणाले, ''भाजप हा सामुदायिक नेतृत्वावर विश्वास ठेवणार पक्ष आहे. वारसा हक्कानं आलेला हा पक्ष नाही. त्यामुळे या वावड्या आहेत. खासदार गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापैार मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक ही सर्व मंडळी रस्त्यावर उतरुन काम करणारे आहेत, पेपरबाजी करणारे नाहीत,'' असे बीडकर म्हणाले.

''शहर भाजप एकसंघ आहे, काही जण वावड्या उठवितात, गॉसिप करतात, पण आमच्यात एकमत आहे. आम्ही सर्व जण एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. पीएमआरडीएच्या निवडणुकीत हे तीनही पक्ष आमची एकही जागा पाडू शकले नाही. त्यांच्यातच एकवाक्यता नाही, असा टोला बीडकर यांनी महाविकास आघाडीला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com