पुणे महापालिकेचे SC आणि ST प्रवर्गाचे आरक्षण जाहीर

आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.
PMC Election 2022 Latest News
PMC Election 2022 Latest Newssarkarnama

पुणे : पुणे महापालिकेच्या (PMC) आगामी निवडणुकीसाठी अनुसुचित जाती (SC) आणि अनुसुचित जमातीसाठी (ST) आरक्षित ५८ प्रभागांमधील आरक्षण (Reservation) बुधवारी (ता.18 मे) जाहीर करण्यात आले. यामध्ये एकून 173 जागांपैकी अनुसुचित जाती प्रवर्गासाठी २३ आणि अनुसुचित जमातीसाठी प्रवर्गाच्या २ जागांचा समावेश आहे. त्यामुळे आता महिला आरक्षण (Women's reservation) सोडतीकडे लक्ष लागले असून त्यानंतरच प्रभागांचे चित्र स्पष्ट होणार आहे. (PMC Election 2022 Latest Marathi News)

PMC Election 2022 Latest News
PMC कडून निवडणूकीसाठी कार्यालयाचा शोध!

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांची अंतिम प्रभाग रचना आणि नकाशे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पुणे पालिकेकडून बुधवारी रात्री उशीराने संकेतस्थळावर ५८ प्रभागांमधील अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीसाठी प्रवर्गांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. इतर मागासवर्गाचे आरक्षण (OBC Reservation) न्यायालयाने रद्द ठरविल्यामुळे प्रशासनाकडून फक्त अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीसाठीच्या प्रवर्गांचेच आरक्षण निश्चित केलेले आहे.

संबधित प्रभागातील 2011 च्या लोकसंख्येनुसार 35 लाख 56 हजार 824 इतकी लोकसंख्या निवडणूक आयोगाने गृहीत धरली असून एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार हे आरक्षण निश्चित केले आले. आता ज्या प्रभागांमध्ये हे आरक्षण निश्चित झाले. त्यामध्ये महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतरच नक्की कोणती जागा महिला अनुसुचित जाती, जमातीसाठी आहे याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

PMC Election 2022 Latest News
राज ठाकरेंची पाठ फिरताच मनसेत राडा; पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर

दरम्यान 50 टक्के महिला आरक्षणानुसार ५८ पैकी २९ प्रभागांमध्ये प्रत्येकी २ महिला उमेदवार असणार आहे. तर एक खुल्या प्रवर्गातील आणि एक आरक्षित प्रवर्गातील असेल. महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ऑगस्टमध्ये होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अनुसुचित जातीचे आरक्षित प्रभाग...

प्रभाग क्र. प्रभागाचे नाव, लोकसंख्या, एससी

प्रभाग क्र. २० - पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड – ६७ हजार १२९- १९ हजार ५६२

प्रभाग क्र. ५० - सहकारनगर – तळजाई – ६१ हजार २४४ – १६ हजार ३२

प्रभाग क्र. ४८ - अप्पर सुप्पर-इंदिरानगर – ५६ हजार ८८४ – १४ हजार ६९१

प्रभाग क्र. ८ - कळस – फुलेनगर – ६२ हजार २७३ – १५ हजार ५८७

प्रभाग क्र. २७ - कासेवाडी लोहियानगर – ६८ हजार ५०१ – १६ हजार ६९

प्रभाग क्र. ९ - येरवडा – ७१ हजार ३९० – १६ हजार १३९

प्रभाग क्र. ११ - बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ६२ हजार २६९ – १३ हजार ११५

प्रभाग क्र. ७ - कल्यानीनगर-नागपुरचाळ – ६७ हजार ७३९ – १४ हजार १५४

प्रभाग क्र.37 - जनता वसाहत- दत्तवाडी – ६९ हजार ६७२ – १४ हजार २०९

प्रभाग क्र ३८ - शिवदर्शन -पद्मावती – ६४ हजार २२१ -१३ हजार ४३

प्रभाग क्र. १ - धानोरी-विश्रांतवाडी – ५५ हजार ४८८ – १० हजार ९२७

प्रभाग क्र. ४२ - रामटेकडी-सय्यदनगर – ४९ हजार २५ – ९ हजार ३७०

प्रभाग क्र. २६ - वानवडी गावठाण-वैदुवाडी – ५९ हजार २० – १० हजार ९९३

प्रभाग क्र. २२ - मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी – ६१ हजार ८७८ – ११ हजार ४९४

प्रभाग क्र. १० - शिवाजीनगर गावठाण- संगमवाडी- ६२ हजार ४८१ – ११ हजार ४९४

प्रभाग क्र. ३९ - मार्केटयार्ड-महर्षीनगर – ६० हजार ५३७ – १० हजार ८५४

प्रभाग क्र. २१ - कोरेगाव पार्क – मुंढवा – ६७ हजार ५७४ – ११ हजार ७६१

प्रभाग क्र. ४७ - कोंढवा बु.-येवलेवाडी – ५४ हजार ४९२ – ९ हजार २०६

प्रभाग क्र. ४६ - मोहमंदवाडी-उरुळी देवाची – ५२ हजार ७२०- ८ हजार २६

प्रभाग क्र. १९ - छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम- रास्ता पेठ – ५८ हजार ९९४ – ८ हजार ७८५

प्रभाग क्र. ४ - पुर्व खराडी- वाघोली- ५८ हजार ९१२ – ८ हजार ५६४

प्रभाग क्र. १२ - औंध-बालेवाडी – 63 हजार 362- 8 हजार 996

प्रभाग क्र. ३ - लोहगाव- विमाननगर – ६१ हजार ८३६ – ८ हजार ५९२

अनुसुचित जमाती आरक्षित प्रभाग...

प्रभाग क्र. १ - धानोरी- विश्रांतवाडी – ५५ हजार ४८८ – १ हजार ६५२ (एसटी )

प्रभाग क्र. १४ - पाषाण – बावधान बुद्रुक – ५७ हजार ९९५ – १ हजार ६२८ (एसटी)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com