Pune Loksabha Election : पुणे लोकसभेची निवडणूक होणार? प्रशासनाची तयारी सुरू...

Pune Loksabha Seat : मतदान केंद्राची चाचपणी...
Pune Loksabha Election Girish Bapat
Pune Loksabha Election Girish Bapat Sarkarnama

Pune Loksabha Election : पुणे लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची जागा आहे. प्रशासनाकडून या निवडणुकीची सद्या तयारी करण्यात येत आहे. मतदान केंद्राची पाहणी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदान केंद्रांची पाहणी केली जात आहे. आणि याबाबत लेखी अहवाल सादर करणाचे आदेश देण्यात आले आहेत.

Pune Loksabha Election Girish Bapat
Girish Bapat Passed Away: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन

पु्ण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यानिधनानंतर पुणे लोकसभा रिक्त झाली आहे. पुण्याची पोटनिवडणूक होणार नाही, असे बोलले जात होते. पुढच्या मे २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे ही निवडणूक न होता, ही जागा रिक्त ठेवली जाणार अशी चर्चा होती. मात्र प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी तयारी करण्यात आहे. मतदान केंद्राची चाचपणी करण्यात येत आहे.

Pune Loksabha Election Girish Bapat
Supreme Court Judgement: राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल 15 मेपर्यंत आलाच नाही तर काय घडणार? सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणाले...

निवडणूक आयोगाकडून अद्याप कसलीही सूचना आले नाहीत, असं प्रशासनाने सांगितले आहे. यामुळे आता निवडणूक होणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ खासदाराची जागा रिक्त ठेवता येत नाही. याच पार्श्वभूमीवर काही कालावधीत ही निवडणूक घेतली जाईल. निवडणूक बिनविरोध झालीच नाही, मतदान प्रक्रियेची वेळ आली तर त्यासाठी ही प्रशासनाची तयरी सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com