इमारतीचा स्लॅब कोसळून पुण्यात सहा मजुरांचा मृत्यू

शास्त्रीनगर चौकतील वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आहे.
Pune Building Collapse News
Pune Building Collapse Newssarkarnama

पुणे : इमारतीचा लोंखडी स्लॅब (iron slab) कोसळून सहा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री पुण्यात ( pune) घडली. यात तीन मजूर गंभीर जंखमी आहेत. येरवड्यातील शास्त्रीनगर येथे गल्ली क्रमांक आठ येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम राबवून दहा मजूरांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या मजुरांवर आता उपचार सुरु आहेत. (Pune Building Collapse News)

शास्त्रीनगर चौकातील वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांकडून स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या चार ते सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व जवानांनी कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. दरम्यान या घटनेत मोठ्याप्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. स्लॅबचा ढिगारा आणि सळयांमध्ये अडकलेल्या कामगारांना पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. काही कामगार या सळयांमध्ये अडकल्याने सळया कापून त्यांना बाहेर काढल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Pune Building Collapse News
नवाब साहेब, हर्बल गांजावाले, नशा सत्तेची असल्यानं असं बिन बुचाचं सुचतयं!

मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बांधकाम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी बांधकाम प्रकल्पावर घेण्यात आली होती की नाही याचा पोलिस तपास करत आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

''स्लॅब नेमका कशामुळे कोसळला व कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी या ठिकाणी घेण्यात आली होती का नाही? याचा तपास सुरू आहे,'' असे येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

पुण्यातील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टि्वट करत शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. सोबतच जे जखमी झालेले आहे त्याची प्रकृती लवकर सुधारावी असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com