Commissioner Transfer : श्रावण हर्डीकर होणार पुणे महापालिकेचे आयुक्त ?

Shrawan Hardikar Transfer : राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचा पहिला टप्पा गुरुवारी पूर्ण झाला.
Shrawan Hardikar Transfer
Shrawan Hardikar Transfer

पुणे : राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचा पहिला टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. गुरुवारी 44 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. आयएएस अधिकाऱ्यांसोबतच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील होणार आहेत. आज किंवा येत्या दोन दिवसात या बदल्या होण्याची शक्यता आहे. या बदल्यांमध्ये पुण्यातून पुणे महापालिकेच्या आयुक्त विक्रमकुमार (Vikram Kumar), पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao), पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) आणि राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर (Shrawan Hardikar) यांची बदली होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून विक्रम कुमार पुणे महापालिकेच्या आयुक्तपदावर काम करत आहेत. ते आधी ते पीएमआरडीएचे आयुक्त होते. तर सौरभराव हे गेली सात वर्ष पुण्यातच विविध पदांवर काम करत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, पुणे महापालिकेचे आयुक्त पदावर त्यांनी काम केलं असून आता ते पुण्याच्या विभागीय आयुक्त पदांवर कार्यरत आहेत. राजेश देशमुख यांची दोन वर्षाची जिल्हाधिकारी पदाची टर्म पूर्ण झालेली आहे. या सर्व बदल्यांमध्ये हर्डीकर, विक्रम कुमार, सौरभ राव आणि राजेश देशमुख या चौघांची बदली होणार की महापालिका निवडणुका होईपर्यंत हे सर्वजण पुण्यातच राहणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

Shrawan Hardikar Transfer
निष्ठेचा सागर उसळणार...! दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा टीझर लॉंच

दरम्यान, या बदल्यामंध्ये आतापर्यंत यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या नावाचा करण्यात आलेला नाही. पण लवकरच पुणे महापालिकेला नवीन आयुक्त मिळणाप असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राहिलेले आणि सध्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची नवीन आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, यावर मुख्यमंत्री न उपमुख्यमंत्री यांचे एकमत झाल्याचे माहिती मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com