Pune Ganeshotsav : पुण्यातील 'ठाकरे-शिंदे सत्तासंघर्ष' पोलिसांनी रोखला..सांगितलं हे कारण..

Pune Ganeshotsav : राज्यातील सत्तासंघर्षावर आधारित ‘सत्तामंथन’ हा देखावा नरेंद्र मित्रमंडळ तयार केला होता, मात्र या देखाव्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
Pune Ganeshotsav
Pune Ganeshotsavsarkarnam

पुणे : दीड महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तात्तर झाले.या सत्तात्तरांची चर्चा ३३ देशात झाली. उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष (shinde thackeray power struggle)पाहायला मिळाला. याचे पडसाद शाखाप्रमुखापासून शिवसैनिकापर्यंत दिसले.

राज्यातील हा सत्तासंघर्ष पुण्यातील गणेशोत्सवात (pune ganeshotsav)दिसणार होता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादात सामान्य व्यक्तीचे कसे मरण होत आहे, हे या देखाव्यात सादर करण्यात येणार होते.

राज्यातील सत्तासंघर्षावर आधारित ‘सत्तामंथन’ हा देखावा नरेंद्र मित्रमंडळ तयार केला होता, मात्र या देखाव्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’ या नावाने सादर होणाऱ्या देखाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर दाखवण्यात आले आहे. हे दोघे सत्तेचे समुद्रमंथन करीत आहेत.

Pune Ganeshotsav
MA khan : शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्ये गळती सुरु : माजी खासदाराचा राजीनामा

पुण्यातील नरेंद्र मित्र मंडळाकडून या देखाव्याची परवानगी मागण्यात आली होती. पोलिसांनी नकार दिल्यामुळे मंडळाकडून नवीन देखावा तयार करण्यात येणार आहे. तर कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा आमचा हेतू नव्हता असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना पोलिसांकडून या देखाव्याची परवानगी नाकारल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आमच्या देखाव्यामुळे कुठल्या ही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न नव्हता, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. पण शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com